नवी दिल्ली - गेल्या आठवडाभरापासून वाढत असलेले पेट्रोल आणि डिझेलचे दर बुधवारी स्थिर राहिले होते. त्यानंतर मात्र पेट्रोलचे दर दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नईमध्ये सहा पैशांनी आज पुन्हा वाढले आहेत. तर डिझेलचे दर चारही महानगरामध्ये सात पैशांनी वाढले आहेत.
सौदी अरेबियामधील तेल शुद्धीकरण प्रकल्पावर ड्रोन हल्ला झाल्यापासून जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर वाढत आहेत. दिल्लीत पेट्रोलचे दर १६ सप्टेंबरपासून प्रति लिटर २ रुपयांनी वाढले आहेत. तर डिझेलचे दर १.७० रुपयांनी वाढले आहेत. देशातील इतर शहरातही ग्राहकांना पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीची मोठी झळ बसत आहे.
इंडियन ऑईल वेबसाईटच्या माहितीनुसार असे आहेत कच्च्या तेलाचे दर
शहर | पेट्रोलचा दर (प्रति लिटर रुपयामध्ये) | डिझेलचा दर (प्रति लिटर रुपयामध्ये) |
दिल्ली | ७४.१९ | ६७.१४ |
कोलकाता | ७६.८८ | ६९.५६ |
मुंबई | ७९.८५ | ७०.४४ |
चेन्नई | ७७.१२ | ७०.९८ |
हेही वाचा-पेट्रोल-डिझेलच्या खरेदीवर क्रेडिट कार्डद्वारे मिळणारी सवलत १ ऑक्टोबरपासून बंद
दरम्यान, पेट्रोल पंपावर पेट्रोल-डिझेलची खरेदी करण्यासाठी क्रेडिट कार्डचा वापर केल्यास सवलत देण्यात येते. ही सवलत १ ऑक्टोबरपासून बंद करण्याचा निर्णय सरकारी तेल कंपन्यांनी घेतला आहे.
हेही वाचा-पेट्रोल-डिझेल भडकण्यास सुरुवात; जागतिक बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या दरवाढीचा फटका