ETV Bharat / business

पेट्रोल-डिझेलचे दर तीन दिवसांनतर पुन्हा भडकले!

पेट्रोल-डिझेलचे दर तीन दिवस स्थिर राहिल्याने ग्राहकांना काहीअंशी दिलासा मिळाला होता. मात्र, आज पुन्हा दर वाढल्याने ग्राहकांच्या खिशाला कात्री लागली आहे. दिल्लीत पेट्रोल प्रति लिटर ७४.४२ रुपयांनी विकले जात आहे. तर डिझेलचा दर प्रति लिटर ६७.३३ रुपये आहे.

संग्रहित - पेट्रोल पंप
author img

By

Published : Sep 30, 2019, 1:27 PM IST

नवी दिल्ली - पेट्रोल-डिझेलचे दर तीन दिवस स्थिर राहिल्यानंतर आज पुन्हा वाढले आहेत. इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या आकेडवारीनुसार पेट्रोलचे दर ७ ते ८ पैशांनी व डिझेलचे दर ९ ते १० पैशांनी महानगरांमध्ये वाढले आहेत.

पेट्रोल-डिझेलचे दर तीन दिवस स्थिर राहिल्याने ग्राहकांना काहीअंशी दिलासा मिळाला होता. मात्र, आज पुन्हा दर वाढल्याने ग्राहकांच्या खिशाला कात्री लागली आहे. दिल्लीत पेट्रोल प्रति लिटर ७४.४२ रुपयांनी विकले जात आहे. तर डिझेलचा दर प्रति लिटर ६७.३३ रुपये आहे.

कोलकातामध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर ७७.१० रुपये, मुंबईत ८०.०८ रुपये तर चेन्नईत ७७.३६ रुपये आहे.कोलकातामध्ये डिझेलचा दर प्रति लिटर ६९.७५ रुपये, मुंबईत ७०.६४ रुपये तर चेन्नईत ७१.१९ रुपये प्रति लिटर आहे.

हेही वाचा-कोणत्याही गुंतवणूकदाराचे गोव्यासह देशात स्वागतच - मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

या कारणाने वाढले आहेत पेट्रोल-डिझेलचे दर-
सौदी अरेबियामधील तेल शुद्धीकरण प्रकल्पावर १३ सप्टेंबरमध्ये ड्रोन हल्ला झाला होता. त्यानंतर जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर वाढत आहेत. याचा परिणाम म्हणून १७ सप्टेंबरपासून पेट्रोलचा दर प्रति लिटर २.२५ रुपयांनी तर डिझेलचे दर १.७५ रुपयांनी वाढले आहेत.

हेही वाचा-शेअर बाजार निर्देशांकात सकाळच्या सत्रात ३०० अंशाची घसरण; ऑटोसह धातुंच्या शेअर विक्रीचा परिणाम

पेट्रोल-डिझेलच्या दरावर या घटकांचा होतो परिणाम-
भारतीय तेल मार्केटिंग कंपन्यांकडून जागतिक बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या किमतीचा रोज आढावा घेतला जातो. या कच्च्या तेलाच्या दरानुसार पेट्रोल-डिझेलचे दर सरकारी तेल कंपन्या निश्चित करतात. रुपयाची डॉलरच्या तुलनेत झालेली घसरण, कच्च्या तेलाचे वाढलेले दर, वाढती मागणी आणि जागतिक आर्थिक मंचाची स्थिती यांचाही पेट्रोल-डिझेलच्या दरावर परिणाम होत असतो.

Intro:Body:

Dummy

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.