नवी दिल्ली - इराण-अमेरिकेत वाढलेल्या तणावानंतर जागतिक बाजारपेठेत खनिज तेलाचे दर वाढले आहेत. देशातील महत्त्वाच्या शहरात पेट्रोलचे दर आज १० ते ११ पैशांनी वाढले आहेत. तर डिझेलचे दर १५ ते १६ पैशांनी वाढले आहेत.
इंडियन ऑईल वेबसाईटच्या आकडेवारीनुसार नवी दिल्लीत पेट्रोल प्रति लिटर ७५.४५ रुपये आहे. तर मुंबईत आणि कोलकात्यात पेट्रोल प्रति लिटर ८१.०४ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोल प्रति लिटर ७८.३९ रुपये आहे. देशातील महत्त्वाच्या शहरात डिझेलचे दरही वाढले आहेत. नवी दिल्लीत डिझेल प्रति लिटर ६८.४० रुपये, मुंबईत ७१.७१ रुपये प्रति लिटर, कोलकात्यात ७०.७६ रुपये प्रति लिटर आहे. तर चेन्नईत डिझेल ७२.२८ रुपये प्रति लिटर आहे.
हेही वाचा-सायरस मिस्त्री प्रकरण : रतन टाटा यांची सर्वोच्च न्यायालयात स्वतंत्र याचिका
अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात इराणच्या बिगरलष्करी सशस्त्र संघटनेचा टॉप कमांडर कासीम सुलेमानी याचा शुक्रवारी मृत्यू झाला. त्यानंतर मध्यपूर्वेत तणाव वाढला आहे. पेट्रोल-डिझेलच्या किमती जागतिक कच्च्या तेलाच्या (क्रूड तेल) दरावर अवलंबून असतात. तसेच रुपयाचा डॉलरमधील विनिमय दराचाही पेट्रोल-डिझेलच्या दरावर अवलंबून होता. कारण देशात लागणाऱ्या ८० टक्के खनिज तेलाची डॉलरमध्ये आयात करण्यात येते. सरकारी खनिज तेल विपणन कंपन्या रोज पेट्रोल-डिझेलच्या किमतीचा आढावा घेतात. कंपन्यांनी बदलले दर हे सकाळी सहा वाजल्यापासून लागू होतात.
हेही वाचा-'या' स्मार्टफोनच्या खरेदीवर मिळणार २० हजार रुपयापर्यंत कॅशबॅक