नवी दिल्ली - पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचे सत्र सुरुच आहे. देशाच्या आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत पेट्रोल प्रति लिटर ८० रुपयांवर पोहोचले आहे. तर डिझेलचा दर प्रति लिटर ७०.५५ रुपये झाला आहे.
महाराष्ट्रात सर्वात अधिक पेट्रोल आणि डिझेल परभणीत महागले आहेत. परभणीत पेट्रोलला प्रति लिटर ८१.९३ रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर ७१.३१ रुपये झाला आहे.
हेही वाचा-पेट्रोल-डिझेलच्या खरेदीवर क्रेडिट कार्डद्वारे मिळणारी सवलत १ ऑक्टोबरपासून बंद
दिल्ली, कोलकाता आणि मुंबईत पेट्रोलचे दर १५ पैशांनी वाढले आहेत. तर चेन्नईत पेट्रोलचे दर हे १६ पैशांनी वाढले आहेत. दिल्ली आणि कोलकातामध्ये डिझेलचे दर हे १० पैशांनी वाढले आहेत. तर मुंबई आणि चेन्नईत डिझेलचे दर ११ पैशांनी वाढले आहेत. देशाच्या इतर भागातही पेट्रोल-डिझेलचे दर वाढले आहेत.
हेही वाचा-कच्च्या तेलाचे दर एक दिवसच राहिले स्थिर; ग्राहकांना दरवाढीची पुन्हा झळ
इंडियन ऑईलच्या वेबसाईटनुसार असे आहेत पेट्रोल-डिझेलचे दर
शहर | पेट्रोलचा दर (प्रति लिटर, रुपयामध्ये) | डिझेलचा दर (प्रति लिटर, रुपयामध्ये) |
दिल्ली | ७४.४३ | ६७.२४ |
कोलकाता | ७७.०३ | ६९.६६ |
मुंबई | ८० ७० | ७०.५५ |
चेन्नई | ७७.२८ | ७१.०९ |
हेही वाचा-'फरार आर्थिक गुन्हेगार' म्हणून जाहीर करण्याच्या ईडीच्या याचिकेला नीरव मोदीचा विरोध