नवी दिल्ली – प्राप्तिकर विभागाने आर्थिक वर्ष 2019-2020 साठीच्या प्राप्तिकर परताव्याचे (आयटीआर) विवरण पत्र भरण्यासाठी मुदत 30 नोव्हेंबरपर्यंत वाढविली आहे.
सध्याच्या परिस्थितीचा विचार करता आणि समजून घेत विवरण पत्र भरण्याकरता मुदत वाढविल्याचे प्राप्तिकर विभागाने म्हटले आहे. यापूर्वी प्राप्तिकर विभागाने प्राप्तिकर परताव्याचे विवरण पत्र भरण्यासाठी 31 जुलैपर्यंत मुदत वाढवून दिली होती. सरकारने आधार कार्ड हे पॅनकार्डला संलग्न करण्याच्या मुदतीतही वाढ केली आहे. नव्या सूचनेप्रमाणे नागरिकांना 2021 पर्यंत आधार कार्ड हे पॅनला संलग्न करण्याची मुदत मिळणार आहे.
कोरोना व टाळेबंदीने अनेक उद्योग, व्यवसाय आणि रोजगारांवर परिणाम झाला आहे. शारीरिक अंतराच्या नियमांमुळे नागरिकांना घराबाहेर पडण्यासाठी मर्यादा येत आहेत. अशा स्थितीत प्राप्तिकर विभागाने आयटीआर व आधार-पॅन लिंक करण्यासाठी मुदतवाढ देवून नागरिकांना दिलासा दिला आहे.