नवी दिल्ली - देशातील चौथ्या टाळेबंदीत अर्थचक्राला प्रोत्साहन देणारे सकारात्मक वृत्त आहे. महाराष्ट्रातील फियाट इंडिया ऑटोमोबाईल्स प्रा. लि. (एफआयएपीएल) कंपनी आणि टाटा कंपनीची मालकी असलेल्या रांजणगावातील उत्पादन प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.
एफआयएपीएलच्या व्यवस्थापनाने प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष ३ हजार कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी व्यापक कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. एफएपीएल कंपनीकडून प्रवासी वाहनांचे उत्पादन घेण्यात येते. रांजणगावामधील वाहन उत्पादन प्रकल्पात स्वच्छता, निर्जंतुकीकरण आणि शारीरिक अंतर यांचे पालन केले जाते.
हेही वाचा-' आत्मनिर्भर' आर्थिक पॅकेजवर 'या' राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा नाराजीचा सूर
एफआयएपीएलचे अध्यक्ष रवी गोगिया म्हणाले, की कमी मनुष्यबळात कंपनीचे काम सुरू करण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला आमचे पूर्ण प्राधान्य आहे. पुरवठा साखळी पुन्हा क्रियाशील केली आहे. हळूहळू पुरवठा करणे आणि कामाचे प्रमाण वाढविणे हे उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा-नाबार्डकडून सहकारी बँकांसह प्रादेशिक ग्रामीण बँकांना २०,५०० कोटींचे वाटप
दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कंटेन्मेंट वगळता इतर क्षेत्रातील उद्योग सुरू करण्याचे आवाहन केले होते. टाळेबंदी असल्याने महाराष्ट्रातील ऑटो हब असलेल्या पुण्याला मोठा फटका बसला आहे.