सॅन फ्रान्सिस्को- फेसबुक आणि गुगलने समुद्रमार्गे केबलचा विस्तार करण्याचे नियोजन केले आहे. ही केबल अमेरिकेतील समुद्रमार्गे सिंगापूर आणि इंडोनिशियापर्यंत नेण्यात येणार आहे.
समुद्रमार्गे केबलचा विस्तार करण्यासाठी फेसबुकने इको आणि बिफ्रोस्ट या कंपन्यांबरोबर भागीदारी केली आहे. या कंपन्या आशिया-पॅसिफिक प्रदेश आणि उत्तर अमेरिकेत केबलचा विस्तार करण्यासाठी मदत करणार आहे. गुगलने केवळ इको कंपनीत गुंतवणूक केली आहे. तर फेसबुकने दोन्ही कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. जास्तीत जास्त लोक वेगवान इंटरनेटवर आणण्यासाठी फेसबुक बांधील असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
हेही वाचा-मौल्यवान धातुंच्या दरात घसरण सुरुच; चांदी प्रति किलो 331 रुपयांनी स्वस्त
पहिल्यांदाच अमेरिका ते सिंगापूर इंटरनेट फायबर केबलने जोडण्यात येणार-
इंटरनेट केबलमुळे इंटरनेटची क्षमता, विश्वासर्हता आणि उपयुक्तता वाढणार आहे. कोरोना महामारीच्या काळात लोकांना विश्वासार्ह असलेल्या इंटरनेटच्या आवश्यकता आहे. अशाच काळात गुगल आणि फेसबुकने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. इको आणि बिफ्रोस्टच्या मदतीने कोट्यवधी लोकांना उद्योगांमध्ये विकास करणे शक्य होईल, असे फेसबुकने म्हटले आहे. गुगल क्लाउडचे उपाध्यक्ष विकाश कोले म्हणाले की, इकोकडून पहिल्यांदाच अमेरिका ते सिंगापूर इंटरनेट हे वेगवान पद्धतीने फायबर केबलने जोडण्यात येणार आहे.
हेही वाचा-आर्थिक वर्षाखेर शेअर बाजारात 627 अंशाची पडझड
दरम्यान, दोन्ही प्रदेशातील केबलच्या विस्ताराला नियामक संस्थांकडून मंजुरी मिळवावी लागणार आहे.