नवी दिल्ली - फास्टॅग हे १ जानेवारीपासून सर्व वाहनांसाठी बंधनकारक होणार असल्याचे केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. ते ऑनलाईन कार्यक्रमात बोलत होते.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, की फास्टॅगचा वापर केल्याने टोलनाक्यावरील गर्दी कमी होण्यास मदत होते. फास्टॅगचा वापर केल्याने वाहनांना टोलनाक्यावर थांबावे लागणार नाही. त्यामुळे त्यांच्या पैशासह इंधनाची बचत होणार आहे.
सर्वप्रथम २०१६ मध्ये फास्टॅगचा वापर-
२०१८ पर्यंत ३४ लाख वाहनांना फास्टॅग देण्यात आले आहे. केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने जुन्या वाहनांनाही १ जानेवारी २०२१ पासून फास्टॅग बंधनकारक केले आहे. तसेच १ डिसेंबर २०१७ पूर्वी विक्री झालेल्या वाहनांनाही फास्टॅग बंधनकारक करण्यात आले आहे. फास्टॅगचा वापर टोलनाक्यावर इलेक्ट्रॉनिक व्यवहार करण्यासाठी करण्यात येतात. सर्वप्रथम २०१६ मध्ये फास्टॅगचा वापर सरकारने करण्यास सुरुवात केली आहे.
हेही वाचा-चांदीच्या दरात प्रति किलो १,१०२ रुपयांची वाढ; सोनेही महाग!
केंद्रीय मोटर वाहन कायदा १९८९ कायद्यानुसार चारचाकी वाहनांना १ डिसेंबर २०१७ पासून फास्टॅग बंधनकार करण्यात आले आहे. वाहतुकीसाठी लागणारे फिटनेस प्रमाणपत्र घेण्यापूर्वी फास्टॅगही बंधनकार करण्यात आले आहे.
हेही वाचा-अनधिकृत डिजीटल अॅपवरून कर्ज घेताना सावध! आरबीआयकडून जनतेला इशारा
काय आहे फास्टॅग-
फास्टॅग ही टोलचे पैसे प्रीपेड भरण्याची सुविधा आहे. यामुळे वाहनचालकाला टोलनाक्यावर वाहन न थांबविता पुढे जाणे शक्य होते. यामध्ये रेडिओ फिक्वेन्सीची ओळख असलेली चीप वाहनाला बसविण्यात येते.
सध्या फास्टॅग नसतानाही त्यासाठी असलेल्या रांगेमधून वाहने जात असतात. त्यामुळे टोल नाक्यावर वाहनांची अनेकदा गर्दी होत असते. अद्याप, फास्टॅगचा वापर वाढलेला नाही. त्या पार्श्वभूमीवर फास्टॅगचा वापर होण्यासाठी प्रोत्साहन देणारा निर्णय सरकारने घेतला आहे.