नवी दिल्ली - मालवाहू भाडे आणि तिकिट दर हे तर्कसंगत करण्यासाठी प्रक्रिया करण्यात येत असल्याचे रेल्वे मंडळाचे चेअरमन व्ही. के. यादव यांनी सांगितले. मात्र, किती दर वाढणार आहेत, हे सांगण्यास त्यांनी नकार दिला.
रेल्वेच्या महसुलाचे प्रमाण कमी होताना विविध सुधारणा करण्यास सुरुवात केल्याचे यादव यांनी माध्यमांशी बोलताना गुरुवारी सांगितले. तिकिटांचे दर वाढविणे हा संवदेनशील विषय आहे. त्याबाबत अंतिम निर्णय घेण्यापूर्वी दीर्घकाळ चर्चा करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. मालवाहू भाडे हे आधीच जास्त आहे. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक ही रेल्वेकडे वळविणे हे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा-पीएमसी घोटाळा; मुंबई पोलिसांकडून न्यायालयात स्वतंत्र आरोपपत्र दाखल
मंदावलेल्या अर्थव्यवस्थेचा भारतीय रेल्वेला फटका बसला आहे. चालू वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत प्रवासी वाहतुकीने होणाऱ्या महसुलात १५५ कोटी रुपयांची घट झाली आहे. तर मालवाहू भाड्यातून मिळणाऱ्या महसुलात ३ हजार ९०१ कोटी रुपयांची घट झाली आहे.
हेही वाचा-रेल्वे सेवांच्या विलिनीकरणानंतरही अधिकाऱ्यांची सेवाज्येष्ठता राहणार अबाधित