नवी दिल्ली - इन्स्टाग्राम हे सेलिब्रिटीसह तरुणाईंमध्ये चांगलेच लोकप्रिय ठरत असताना फेसबुक कंपनीने एक पाऊल ठरणारा निर्णय घेतला आहे. १३ वर्षांहून कमी वय असलेल्या मुलांनाही इन्स्टाग्रामवर खाते काढता येणार आहे.
इन्स्टाग्रामचे प्रमुख अॅडम मोस्सेरी म्हणाले की, फोटो शेअरिंग अॅपचा आणखी विस्तार करण्यात येणार आहे. पुढे ते म्हणाले की, लहान मुलांकडून पालकांना इन्स्टाग्राम अॅप घेण्याबाबत सातत्याने विचारणा होत असते. जर ते इन्स्टामध्ये सहभागी झाले तर आणखी मित्रांशी संपर्कात राहू शकतात. मुलांसाठी असलेल्या इन्स्टाग्राम अॅपमध्ये पालक त्यावर नियंत्रण ठेवू शकणार आहेत. याबाबत अधिक माहिती लवकरच शेअर करणार आहोत. यावर कंपनीचे उपाध्यक्ष पवनी दिवाणजी काम करत असल्याचे मोस्सेरी यांनी म्हटले आहे.
हेही वाचा-बीएमडब्ल्यूचेही येणार इलेक्ट्रिक मॉडेल; चालू वर्षात आय फोर होणार लाँच
पालकांसाठी जाहीर केल्या मार्गदर्शक सूचना-
ज्या मुलांचे वय १८ हून कमी आहे, अशा खात्यावर मेसेज करणारे फीचर इन्स्टाग्रामने नुकतेच लाँच केले आहे. जर मुलांना मोठ्या प्रमाणात मेसेज अथवा मैत्रीची विनंती पाठविण्यात असतील तर अशी खाती संशयास्पद म्हणून गृहित धरली जात असल्याचे इन्स्टाग्रामने म्हटले आहे. भारतासह इतर देशांमध्ये मुलांच्या इन्स्टाग्राम वापराबाबत पालकांसाठी असलेल्या मागर्दर्शक सूचना कंपनीने जाहीर केल्या आहेत.
हेही वाचा-डिजीटल व्यवहाराचे प्रमाण वाढून ६७ टक्के-स्टेट बँकेचे चेअरमन