ETV Bharat / business

वापरकर्त्याने सेटिंगमध्ये बदल केला तरी लोकेशनची मिळते माहिती - फेसबुकची कबुली - Facebook privacy issue

फेसबुक गोपनयीतेचे (प्रायव्हसी) उपप्रमुख रॉब शेरमॅन यांनी अमेरिकेचे लोकप्रतिनिधी जॉश हॉले आणि ख्रिस्तोफर ए. कून्स यांना लिहिलेले पत्र ट्विटरवर व्हायरल झाले आहे. यामध्ये शेरमॅन यांनी सोशल मीडियातील आघाडीची कंपनी वापरकर्त्याचे ठिकाण कसे ट्रॅक करते, याची माहिती दिली आहे.

Facebook
फेसबुक
author img

By

Published : Dec 19, 2019, 7:58 PM IST

वॉशिंग्टन - तुम्ही फेसबुक वापरत असाल तर ही तुमच्यासाठी धक्कादायक बातमी असू शकते. वापरकर्त्याने ठिकाणाचा (लोकेशेन) पर्याय बंद केला तरी त्याची माहिती घेण्यात येते, अशी स्पष्ट कबुली फेसबुकने दिली आहे. तशा आशयाचे पत्र फेसबुक गोपनीयतेच्या (प्रायव्हसी) वरिष्ठ अधिकाऱ्याने अमेरिकेच्या लोकप्रतिनिधीला लिहिले आहे.

फेसबुक गोपनयीता (प्रायव्हसी) उपप्रमुख रॉब शेरमॅन यांनी अमेरिकेचे लोकप्रतिनिधी जॉश हॉले आणि ख्रिस्तोफर ए. कून्स यांना लिहिलेले पत्र ट्विटरवर व्हायरल झाले आहे. यामध्ये शेरमॅन यांनी सोशल मीडियातील आघाडीची कंपनी वापरकर्त्याचे ठिकाण कसे ट्रॅक करते याची माहिती दिली आहे.

हेही वाचा-'ठेवीदारांच्या हिताकरता एचडीआयएलसह वाधवानची मालमत्ता विकावी'

वापरकर्त्याने ठिकाणाची माहिती देण्याचा पर्याय बंद केला तरी माहिती घेण्यात येते. हे पैसे कमिवण्यासाठी (जाहिराती दर्शविण्यासाठी) करण्यात येते. तिथे कोणताही पर्याय नाही. तुमच्या वैयक्तिक माहितीवर तुमचे नियंत्रण नाही. ही मोठी तंत्रज्ञान कंपनी आहे. काँग्रेसने त्यावर कारवाई करायला पाहिजे, असे ट्विट लोकप्रतिनिधी जॉश हॉले यांनी केले आहे.

हेही वाचा-देशात रेशन कार्डाची संरचनाही एकच असणार; केंद्राचे राज्यांना निर्देश

वापरकर्त्याचे ठिकाण खासगी ठेवत त्यांच्या गोपनीयतेचा आदर करावा, असे लोकप्रतिनिधींनी गेल्याच महिन्यात म्हटले होते.

फेसबुकला असे कळते तुमचे ठिकाण -
जर तुम्ही स्थानिक संगीत महोत्सवाच्या कार्यक्रमाला गेला असताना ठिकाणाचा दुवा असलेला फोटो अपलोड केल्यानंतर फेसबुकला माहिती समजते. तसेच तुमच्या मित्राला टॅग केल्यानंतरही ठिकाणाची फेसबुकला माहिती कळते. फेसबुकने गोपनीयतेवर नियंत्रण ठेवण्याची सुविधा देणारे अँड्राईड अ‌ॅप फेब्रुवारीमध्ये लाँच केले. यामध्ये वापरकर्त्याची माहिती आणि ठिकाण याची माहिती न देण्याचा पर्याय आहे. मात्र, याच्या माध्यमातून वापरकर्ता फेसबुकचा वापर करत नसतानाच लोकेशनची माहिती गुप्त ठेवता येते. फेसबुकचा वापर सुरू केल्यानंतर तुमचे लोकेशन आपोआप फेसबुकला समजते.

Intro:Body:

Dummy news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.