ETV Bharat / business

‘पंतप्रधान गरीब कल्याण योजनेला मुदतवाढ देणे हे ऐतिहासिक पाऊल’

author img

By

Published : Jul 1, 2020, 3:38 PM IST

गरीब कल्याण योजनेला मुदतवाढ दिल्याबद्दल पंतप्रधान गरीब कल्याण योजनेला केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री पासवान यांनी आभार मानले आहेत. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेला मुदतवाढ मिळेल की नाही, याबाबत संभ्रमावस्था होती. मात्र, योजनेला नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिल्याचे त्यांनी सांगितले.

रामविलास पासवान
रामविलास पासवान

नवी दिल्ली – पंतप्रधान गरीब कल्याण योजनेला नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याच्या निर्णयाचेकेंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी स्वागत केले. या योजनेला मुदतवाढ देण्याचा निर्णय हे ऐतिहासिक पाऊल आहे. त्याचा गरिबांना लाभ होणार असल्याचे केंद्रीय मंत्री पासवान यांनी सांगितले.

पासवाना म्हणाले, की राज्यांनी रेशन लोकांमध्ये वितरित करावे, अशी मी विनंतो करतो. त्याचा गरिबांपर्यंत लाभ मिळवून द्यावा. राज्य सरकार अन्नधान्य महामंडळाच्या गोडावूनमधून रेशन घेवू शकतात, असे पासवान यांनी सांगितले. एक देश एक रेशन कार्ड योजना मार्च 2021 पर्यंत करण्यात येणार असल्याची त्यांनी माहिती दिली. राज्यांच्या संपर्कात आहोत. अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या योजनेमधून 80 कोटी लोकांना मोफत धान्य मिळणार आहे. जुलै ते नोव्हेंबर या पाच महिन्यात प्रत्येक कुटुंबातील सदस्याला 5 किलो गहू, 5 किलो तांदूळ मोफत देण्यात येणार आहे. तसेच 1 किलो डाळ दर महिन्याला देण्यात येणार असल्याची त्यांनी माहिती दिली. मुदतवाढीसाठी सरकारला अतिरिक्त 90 हजार कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.