नवी दिल्ली - केंद्रीय गृहमंत्रालयाने चौथ्या टाळेबंदीत ई-कॉमर्स कंपन्यांना घरपोहोच बिगर जीवनावश्यक वस्तुंची डिलिव्हरी करण्याची परवानगी दिली आहे. या निर्णयाचे ई-कॉमर्स कंपन्यांनी स्वागत केले आहे.
टाळेबंदी ४.० मध्ये आर्थिक चलनवलनाला गती मिळण्यासाठी केंद्र सरकारने ई-कॉमर्स कंपन्यांसाठी नियम शिथील केले आहेत. स्नॅपडीलच्या प्रवक्त्याने ग्रीन, ऑरेंज आणि रेड झोनमधील ग्राहकांना सेवा देण्यासाठी तयार असल्याचे सांगितले. देशभरातील ग्राहकांना लाखो उत्पादने पोहोचू, असेही प्रवक्त्याने सांगितले.
हेही वाचा-टोलनाक्यावर 'हा' नियम मोडला तर भरावे लागणार दुप्पट शुल्क
ई-कॉमर्स कंपन्यांना बिगर जीवनावश्यक वस्तुंची डिलिव्हरी करण्याची परवागनी दिल्याने मध्यम आणि लघू व्यवसायिकांना त्यांचा व्यवसाय पुन्हा सुरू करता येणार आहे. अनेक ग्राहकांनी ऑनलाईन खरेदी करण्याची इच्छा दाखविल्याचे पेटीएम मॉलचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्रीनिवास मोटे यांनी सांगितले. यामध्ये लॅपटॉप, मोबाईल फोन आदी वस्तूंचा समावेश आहे.
हेही वाचा-'केंद्र सरकारची किरकोळ विक्रेत्यांना सावत्र आईसारखी वागणूक'