ETV Bharat / business

सणासुदीला गृहिणींना दिलासा; खाद्यतेल स्वस्त होणार, मोदी सरकारचा निर्णय - खाद्यतेल

केंद्र सरकारने कच्च्या खाद्यतेलांवरील सीमा शुल्कात कपात केली आहे. त्यामुळे यंदाच्या सणासुदीत खाद्यतेल स्वस्त होण्याची चिन्हे आहेत. पाम, सोयाबीन आणि सूर्यफुलाच्या शुल्कातील कपात गुरुवारपासून लागू होणार असल्याची माहिती आहे.

Edible oil
खाद्यतेल
author img

By

Published : Oct 14, 2021, 11:32 AM IST

नवी दिल्ली - दसरा आणि दिवाळीच्या तोंडावर गृहिणींना काहीसा दिलासा देणारी बातमी आहे. केंद्र सरकारने कच्च्या खाद्यतेलांवरील सीमा शुल्कात कपात केली आहे. त्यामुळे यंदाच्या सणासुदीत खाद्यतेल स्वस्त होण्याची चिन्हे आहेत. पाम, सोयाबीन आणि सूर्यफुलाच्या शुल्कातील कपात गुरुवारपासून लागू होणार असल्याची माहिती आहे.

सरकारच्या या निर्णयानुसार, कच्च्या पाम तेलावरील शुल्क 8.25% (आधी 24.75%), आरबीडी पामोलिन 19.25 (आधी 35.75), कच्च्या सोया तेलावरील शुल्क 5.5 (आधी 24.75, रिफायन्ड सोया तेलावर 19.5 (आधी 35.75), कच्च्या सूर्यफूल तेलावर 5.5 (आधी 24.75) आणि रिफायन्ड सूर्यफूल तेलावर 19.25 (आधी 35.75) ) कमी करण्यात आले आहे. शुल्क कमी केल्यामुळे, सीपीओची किंमत 14,114.27 रुपये, आरबीडी 14526.45 रुपयांनी, सोया तेल 19351.95 रुपये प्रति टन कमी झाली आहे. सरकारच्या या निर्णयानंतर खाद्यतेलात 15 रुपयांची कपात होऊ शकते.

निर्णय केव्हा अंमलात येईल -

केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाने (सीबीआयसी) अधिसूचनेत म्हटले आहे की, 14 ऑक्टोबरपासून शुल्कात कपात लागू होईल आणि 31 मार्च 2022 पर्यंत लागू राहील.

गेल्या महिन्यात आयात शुल्कात कपात -

गेल्या महिन्यात 11 सप्टेंबर रोजी पाम तेल, सोया तेल आणि सूर्यफूल तेलावरील सीमा शुल्क कमी करण्यात आले होते. तर कच्च्या पाम तेलावरील मूलभूत आयात शुल्क 10 टक्क्यांवरून 2.5 टक्के करण्यात आले. त्याचबरोबर कच्च्या सोया तेल आणि कच्च्या सूर्यफूल तेलावरील आयात शुल्कही 7.5 टक्क्यांवरून 2.5 टक्के करण्यात आले.

सध्या दसरा व दिवाळीचे सण तोंडावर आहेत. या काळात तेलाचा वापर खूपच होतो. सध्या तेलाचे भाव थोडेफार कमी होत असले, तरी अजूनही कमी व्हायला हवेत. सध्या 15 रुपयांनी किमती कमी झाल्याने सणासुदीच्या खरेदीच्या बजेटमध्ये फार मोठी बचत होणार नाही. पण, ही स्वस्ताईदेखील ठीकच मानायची.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.