नवी दिल्ली - सर्वसामान्य कोरोनाच्या महामारीच्या संकटात विविध समस्यांना सामोरे जात असताना महागाईनेही त्रस्त झाला आहे. खाद्यतेल आणि एलपीजी सिलिंडरच्या किमतींनी गेल्या तीन वर्षातील उच्चांक गाठला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री लागली आहे.
दैनंदिन जीवनात लागणारे खाद्यतेल आणि एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतींनी उच्चांक गाठला आहे.
हेही वाचा-ट्विटरकडून कोरोनाच्या संकटात दानशूरपणा; ३ एनजीओला १५ दशलक्ष डॉलरची मदत
खाद्यतेलाच्या किमती दुप्पट
- उदाहरणार्थ कोलकातामध्ये खाद्यतेलाच्या किमती दोन वर्षात जवळपास दुप्पट झाल्या आहेत.
- मोहरीच्या तेलाची किंमत मे २०१९ मध्ये प्रति लिटर ९० रुपये होती. सध्या मोहरीच्या तेलाची किंमत प्रति लिटर १९० रुपये आहे.
- राईस ब्रानची किंमत २०१९ मध्ये ८० रुपये प्रति लिटर होती. सध्या राईस ब्रानची किंमत प्रति लिटर १५० रुपये आहे.
- शेंगदाणा तेलाची मे महिन्यात २०० रुपये प्रति लिटर किंमत आहे. तर यापूर्वी २०१९ मध्ये शेंगदाणा तेलाची किंमत १५६ रुपये प्रति लिटर किंमत होती.
- सोयाबीन तेलाची किंमत २०१९ मध्ये प्रति लिटर ९५ रुपये होती. सध्या, बाजारात सोयाबीन तेलाची किंमत प्रति लिटर १४० रुपये होती.
- सुर्यफुलाची किंमत २०१९ मध्ये प्रति लिटर १०२ रुपये होती. सध्या सुर्यफुलाची किंमत प्रति लिटर १८० रुपये होती.
एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीचा भडका
- केवळ खाद्यतेलाच्या किमतीच नव्हे तर एलपीजी सिलिंडरच्या किमतीचाही भडका उडाला आहे. कोलकात्यामध्ये १४.२ किलो एलपीजी सिलिंडरची किंमत ८३५ रुपये आहे. तर फेब्रुवारी २०१९ मध्ये एलपीजी सिलिंडरची किंमत ४९६ रुपये होती.
- एलपीजी सिलिंडरच्या किमती दोन वर्षांपासून सातत्याने वाढत आहेत.
- मे २०१९ मध्ये एलपीजी सिलिंडरची किंमत ४९९ रुपये, ऑगस्ट २०२० मध्ये ६२० रुपये, जानेवारी २०२१ मध्ये ७२० रुपये आणि मे २०२१ मध्ये ८३५ रुपये एलपीजी सिलिंडरची किंमत राहिली आहे.
हेही वाचा-व्हॉट्सअपच्या अटी स्वीकारल्या नाही तर, १५ मेनंतर मिळणार मर्यादित सेवा
खाद्यतेलाचा साठा जहाज बंदरावर अडकला
कांडला आणि मुंद्रा जहाज बंदरावर आयात करण्यात आलेला खाद्यतेलाचा साठा क्लिअरिन्सअभावी पडून आहे. हा साठा क्लिअरन्स झाल्यानंतर खाद्यतेलाच्या किमती कमी होतील, असा विश्वास केंद्रीय अन्न मंत्रालयाचे सचिव सुधांशु पांडे यांनी व्यक्त केला.