मुंबई - येस बँक प्रकरणी सोमवारी ईडीने नवीन समन्स जारी केले आहे. अनिल अंबानी,सुभाष चंद्रा आणि नरेश गोयल यांना समन्स बजावण्यात आले आहे. 18 मार्चला चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे.
ईडी कडून 'मनी लाँड्रिंग'च्या संदर्भात राणा कपूर यांची चौकशी सुरू आहे. अनिल अंबानी यांनी येस बँकेकडून तब्बल 12 हजार 800 कोटींच कर्ज घेतले आहे. जे अद्याप भरण्यात आलेले नाही. येस बँकेचे मोठे कर्जदार म्हणून अनिल अंबानी ग्रुप, सुभाष चंद्रा यांचा एस्सेल ग्रुप आणि नरेश गोयल यांचा जेट एअरवेज आहे. एस्सेल समूहाने येस बँकेकडून 8 हजार 400 रुपयांचे कर्ज घेतले आहे.
कर्जाची परतफेड होण्यास विलंब होत आहे. ईडी कडून या सर्व कंपन्यांच्या प्रमुखांना चौकशी साठी समन्स बाजविण्यात येत आहेत. यापूर्वी अनिल अंबानी यांना ईडी कडून चौकशीसाठी समन्स बजाविण्यात आले होते. सोमवारी या प्रकरणी अनिल अंबानी यांना ईडी कार्यालयात हजर व्हायचे होते, मात्र प्रकृतीच्या कारणास्तव अनिल अंबानी यांनी पुढील तारखेची मागणी केली होती.