नवी दिल्ली - खरीप पिकांसाठी किमान आधारभूत किंमत जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. टाळेबंदी, टोळधाड आणि चक्रीवादळ अशी शेतकऱ्यांवर अभूतपूर्व संकटे आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.
सरकारची शेतकर्याबद्दल हीच वागणूक राहिली तर 2022पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होणे, हा एक दुसरा जुमला ठरणार आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे वरिष्ठ नेते अहमद पटेल यांनी मोदी सरकारवर केली आहे.
सरकारकडून दिलासा मिळावा, अशी शेतकऱ्यांना आशा आहे. मात्र वाढलेल्या किमान आधारभूत किमतीने नफा विसरा, पण तोटा आणि शेतकऱ्यांचे कर्जही फिटणार नसल्याची पटेल म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अर्थव्यवहार समितीने 2020-21 या हंगामासाठी पिकांकरिता किमान आधारभूत किंमत वाढवली आहे.