नवी दिल्ली - टाळेबंदीत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने फास्टॅगचे नियम कठोर केले आहेत. फास्टॅगचे स्टिकर नसलेल्या वाहनांनी स्वतंत्र अशा फास्टॅगच्या मार्गिकेमधून (लेन) प्रवेश केल्यास चालकांना दुप्पट शुल्क आकारण्यात येणार आहे.
राष्ट्रीय महामार्ग शुल्कात सुधारणा करणारी अधिसूचना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने १५ मे रोजी काढली आहे. या अधिसूचनेनुसार फास्टॅगच्या मार्गिकेत केवळ फास्टॅगचे स्टिकर असलेल्या वाहनांनाच प्रवेश करता येणार आहे. हा नियम मोडला तर वाहन चालकांना मोठा दंड भरावा लागणार आहे.
काय आहे फास्टॅग?
फास्टॅग ही टोलचे पैसे प्रीपेड भरण्याची सुविधा आहे. यामुळे वाहनचालकाला टोलनाक्यावर वाहन न थांबविता पुढे जाणे शक्य होते. यामध्ये रेडिओ फिक्वेन्सीची ओळख असलेली चीप वाहनाला बसविण्यात येते.