ETV Bharat / business

'देशातील विमान वाहतुकीत १५ ते २० टक्के घसरण होईल' - केंद्रीय नागरी वाहतूक मंत्री हरदीप सिंह पुरी

केंद्रीय नागरी वाहतूक मंत्री हरदीप सिंह पुरी म्हणाले, कोरोनाने निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे आर्थिक तोटे होण्याची शक्यता आहे. मात्र, हा काळ निघून जाणारा आहे. जागतिक आव्हानांमधून भारत संधीचा लाभ घेणार आहे, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला.

Domestic air traffic
विमान वाहतूक
author img

By

Published : Mar 14, 2020, 6:13 PM IST

हैदराबाद - कोरोनाच्या भीतीने देशातील विमान वाहतुकीत १५ ते २० टक्के घसरण होईल, असा अंदाज केंद्रीय नागरी वाहतूक मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी केला. असे असले तरी भारत आव्हानावर मात करत चांगली वृद्धी करेल, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला.

केंद्रीय नागरी वाहतूक मंत्री हरदीप सिंह पुरी म्हणाले, कोरोनाने निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे आर्थिक तोटे होण्याची शक्यता आहे. मात्र, हा काळ निघून जाणारा आहे. जागतिक आव्हानांमधून भारत संधीचा लाभ घेणार आहे, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला. ते 'विंग्ज इंडिया २०२०' या नागरी वाहतूक कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमाचे केंद्रीय नागरी वाहतूक मंत्रालयाने आयोजन केले होते.

हेही वाचा-बंगळुरू : कोरोनाच्या भीतीने इन्फोसिसने बंगळुरूमधील इमारत केली रिकामी

पुढे ते म्हणाले, देशामध्ये १.३० अब्ज कोटी लोक आहेत. त्यामध्ये केवळ ८० जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामधील अनेकजण तब्येतीने ठीक आहेत. भारतामध्ये नागरी उड्डाणाच्या बाजारपेठेत तिसरा क्रमांक होण्याची क्षमता आहे. देशामध्ये येणाऱ्या ११ लाख ७१ हजार ६१ विमान प्रवाशांचे स्क्रीनिंग करण्यात आल्याची त्यांनी माहिती दिली.

हेही वाचा-येस बँकेच्या ग्राहकांना तात्पुरता दिलासा, १८ मार्चला हटणार निर्बंध

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.