नवी दिल्ली - मिठाईच्या दुकानांमधील गोड पदार्थांची विक्री करताना विक्रेत्यांना नव्या नियमांचे पालन करावे लागणार आहे. मिठाई विक्रेत्यांना खुली मिठाई कधी तयार केली आहे व किती दिवसापर्यंत खाण्यास योग्य आहे, याची माहिती दर्शवावी लागणार आहे. हा एफएसएसएआयचा निर्णय १ जून, २०२० पासून लागू होणार आहे.
सध्या भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या (एफएसएसएआय) नियमानुसार केवळ पॅकिंग केलेल्या मिठाईसाठी नियम आहेत. मुदत संपलेली खुली मिठाई खाल्ल्याने ग्राहकांच्या आरोग्याला अपाय होत असल्याचे काही अहवालामधून समोर आले आहे. त्यामुळे एफएसएसएआयने नवे निर्देश जारी केले आहेत.
हेही वाचा-रुपया वधारल्यानंतर सोन्याच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या आजचे दर
सार्वजनिक हित आणि अन्नाच्या खात्रीशीर सुरक्षेसाठी पॅकिंग नसलेले व खुल्या मिठाईसाठी उत्पादनाची तारीख देणे बंधनकारक केल्याचे एफएसएसएआयने म्हटले आहे. त्याचबरोबर कोणत्या तारखेपूर्वी मिठाई वापरण्यासाठी उत्तम याची माहिती देणेही बंधनकारक असणार आहे. अन्न व्यवसायिक विक्रेते (एफबीओ) यांनी नियमांचे पालन करावे, असे एफएसएसएआयने म्हटले आहे. या नियमांचे राज्यांना पालन करावे लागणार आहे.
हेही वाचा-भारतीय उद्योगांनी अमेरिकेत विस्तार करावा; डोनाल्ड ट्रम्प यांची अपेक्षा