नवी दिल्ली - केंद्रीय गृहमंत्रालयाने चौथ्या टाळेबंदीत नियम शिथील करत कॅबला परवानगी दिली आहे. मात्र, कमी प्रवाशांमध्ये कॅब चालविण्यात वाहन चालकांना अडचणी येत आहेत. तर ग्राहकांचाही कॅब चालकांना प्रतिसाद मिळत नाही.
ओला आणि उबेरने चौथ्या टाळेबंदीत काही शहरांमध्ये सेवा पुर्ववत करण्याचे जाहीर केले आहे. यामध्ये दिल्लीसह बंगळुरू शहराचा समावेश आहे. मात्र, रेड झोन असलेल्या मुंबईसह चेन्नई महानगरामध्ये ओला आणि उबेरची सेवा सुरू होणार नाही. सध्या, प्रवाशांकडून कॅबची फारशी मागणी होत नसल्याचेही सूत्राने सांगितले. विमानतळ आणि सहलीसाठी लोक फिरत नाहीत. लोक मर्यादित प्रमाणात प्रवास करत आहेत.
हेही वाचा-कार्यालयात कोरोनाबाधित आढळला तर... आरोग्य मंत्रालयाच्या 'या' आहेत सूचना
कार्यालयात जाण्यासाठी अथवा पूर्ववत कामे करण्यासाठीच लोक प्रवास करत आहेत. सर्वोदय ड्रायव्हर असोसिएशन ऑफ दिल्लीचे अध्यक्ष कमलजीत गिल यांनी येत्या काही दिवसात परिस्थिती सुधारेल, असा विश्वास व्यक्त केला. अनेक चालकांनी वाहने बाहेर काढली आहेत. मात्र, अनेक लोक घरातच असल्याने चालकांना प्रतिसाद मिळत नसल्याचेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा-'ही' कंपनी कोरोनाच्या लढ्याकरता भारताला देणार ११.५ कोटी रुपये
सध्या, सरकारने केवळ केशरी आणि हरित क्षेत्रातच कॅबला परवानगी दिली आहे.