ETV Bharat / business

मुंबई विमानतळावरील अपुऱ्या सुविधेचा आर्थिक विकासदरावर होणार परिणाम, डीएचएलचा इशारा

डीएचएल एक्सप्रेसकडून आयात-निर्यातीसाठी ग्राहकांना सेवा देण्यात येते. त्यासाठी एअर फ्राईट ऑपरेटर म्हणून सेवा देताना विमानतळावर केवळ एकच स्लॉट असल्याचे डीएचएफएल कंपनीने म्हटले आहे.

संग्रहित - मुंबई विमानतळ
author img

By

Published : Aug 4, 2019, 4:57 PM IST

मुंबई - खासगीकरण करूनही मुंबई विमानतळावरील अपुऱ्या सुविधांचा प्रश्न कायम आहे. तिथे पुरेशा सुविधा नसल्याने ५ लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था करण्याच्या महत्त्वाकांक्षेवर परिणाम होईल, असा इशारा लॉजिस्टिक्स कंपनी डीएचएल एक्सप्रेसने दिला आहे.

डीएचएल एक्सप्रेसकडून आयात-निर्यातीसाठी ग्राहकांना सेवा देण्यात येते. त्यासाठी एअर फ्राईट ऑपरेटर म्हणून सेवा देताना विमानतळावर केवळ एकच स्लॉट असल्याचे डीएचएफएल कंपनीने म्हटले आहे.

देशातील सर्वात मोठे विमानतळ असताना तिथे विस्तारण्याचा पर्याय नाही. ग्राहकांकरिता नेटवर्क विस्तारण्यासाठी कमी असलेल्या स्लॉटमुळे बंधन येत असल्याचे डीएचएल एक्सप्रेसचे जागतिक प्रमुख जॉन पिअरसन यांनी सांगितले. देशातील बहुतांश विमानतळामध्ये ऑपरेटरांसाठी पुरेशा जागा असल्याचे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आर. एस. सुब्रमणियन यांनी सांगितले.

जर भारताची अर्थव्यवस्था २०२५ पर्यंत ५ लाख कोटी डॉलरची करायची असेल तर अनेक मार्गांनी आंतरराष्ट्रीय व्यापार वाढणे गरजेचे आहे. पुढे ते म्हणाले, हा व्यापार डीएचएलसारख्या कंपन्यांच्या सहकार्याशिवाय वाढू शकत नाही. अपुऱ्या सुविधामुळे कंपनीला दिल्ली अथवा बंगळुरुमधून डिलिव्हरी करणे भाग पडत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे अर्धा दिवस किंवा एक दिवस उशीर होतो.

काही शहरात पायभूत सुविधा चांगल्या आहेत. तर काही शहरात खूप कमी असल्याने त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. उद्योगानुकलतेला महत्त्व देताना विमानतळाच्या पायाभूत सुविधांकडेही लक्ष देण्याची गरज डीएचएलने व्यक्त केली.

देशामधील कंपनीत ३ हजार २०० कर्मचारी कार्यरत आहेत. वाढती बाजारपेठ म्हणून भारताकडे सकारत्मक दृष्टीने पाहत असल्याचे जॉन पिअरसन यांनी सांगितले.

Intro:Body:

DUmmy

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.