ETV Bharat / business

धारावीत कोरोनानंतर नागरिकांवर 'हे' आहे दुसरे संकट - Corona Impact on poor peoples

आकर्षक व्याजदर व मोठ्या परत्याव्यांचा आशेने धारावीसारख्या वस्त्यांमध्ये काही लोक आणि पतसस्थांकडून भिशी चालविल्या जातात. थोड्या अधिकच्या फायद्यासाठी धोका पत्करून अनेक सामान्य लोक अशा योजनांमध्ये पैसेही गुंतवतात.

भिशी
भिशी
author img

By

Published : May 20, 2020, 8:25 PM IST

Updated : May 20, 2020, 9:19 PM IST

मुंबई - कोरोनाच्या संकटामुळे भिशीत गुंतवणूक करणाऱ्या धारावीतल्या गुंतवणूकदारांना मोठा धक्का बसला आहे. अनेकांचे कोरोना आणि टाळेबंदीने अनेकांनी रोजगार गमाविले आहेत. आयुष्याची सगळी जमापुंजी दिलेल्या भिशीतील पैशांचे काय होणार, असा प्रश्न गुंतणूकदारांना सतावू लागला आहे.

आकर्षक व्याजदर व मोठ्या परत्याव्यांचा आशेने धारावीसारख्या वस्त्यांमध्ये काही लोक आणि पतसस्थांकडून भिशी चालविल्या जातात. थोड्या अधिकच्या फायद्यासाठी धोका पत्करून अनेक सामान्य लोक अशा योजनांमध्ये पैसेही गुंतवतात. घरांचे स्वप्नपूर्तीसाठी, मुलाच्या परदेशी शिक्षणासाठी, आजारपणांसाठी, गरजा पूर्ण करण्यासाठी किंवा निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी कमी वेळात जास्त पैसे मिळावे या उद्देशाने ही गुंतवणूक केली जाते.

आता भिशी मिळेल की नाही याचीही शाश्वती नाही -

धारावीत राहणाऱ्या बीएमसीमधून निवृत्त झालेल्या सुनिता खैरे या महिलेने पतीच्या पैशांमधून धारावी भागामध्ये घर विकत घेतले. उरलेले पैसे गुंतवणूक करण्यासाठी वर्षानुवर्षे मदतीला उपयोगी येणाऱ्या भिशी योजनेमध्ये भरले होते. भिशीतून महिन्याला साधारण १७ हजारांचे व्याज मिळत असल्याने ही चांगली गुंतवणूक ठरली होती. म्हणून धारावीत राहणाऱ्या या खैरे यांनी आणखी पैसे भरले. सर्व सुरळीत चालल होते. पुढे मुलीचे लग्न असल्याने कुटुंबामध्ये पैशांची गरज होती. एक महिना आधी सांगून पैसे पुढच्या महिन्यात भिशी घेता येते. त्यामुळे मार्चमध्ये लग्नाआधी भिशी चालवणाऱ्यांना तसे कळवले होते. आठ दिवसांपूर्वी १७ हजारांचे व्याजही खैरे यांनी घेतले. त्या फेब्रुवारीत पैसे काढणार होत्या. परंतु अवघ्या दोन दिवसांमध्ये कोरोनामुळे बंद झाल्याची बातमी आली. त्यांना खैरे यांना धक्का बसला. मुलीने आणि जावयांनी त्यांना धीर दिला. सध्याचे दिवस ताणतणावाचे असून त्यांची झोप उडाली आहे. कोरोनाचा भीतीने सर्व भिशीचे सदस्य गावी गेले आहेत. कोणाकडे पैसेच नसल्याचे भिशीचे पैसे मिळणे कठीण आहे. तणावाखाली खैरे या 45 वर्षीय महिला भिशी गुंतवणूकदारानी आपली व्यथा मांडली आहे.

मुलाच्या पुढील शिक्षणाचा आणि घर कसे चालणार याची चिंता -
भिशीचे पैसे मिळण्याची शक्यता कमी असल्याने बबलू सुतार यांना मुलाला बंगुळुरूला शिक्षणासाठी पाठविणे कठीण होणार आहे. ते गेल्या 60 वर्षांपासून धारावीत राहतात. रोज मिळेल त्या रोजंदारीवर पत्नीसह तीन मुले घेऊन जगतात.

भिशी म्हणजे काय?

दर महिन्याला ठराविक पैसे एकत्र करून एकमेकांना वापरण्यास देणारा गट असे काहीसे स्वरुप असते. दर महिन्याला एखाद्या सदस्याच्या घरी किंवा अमुक ठिकाणी जमून व्यवहार करण्याची पद्धत आहे.
1) भिशी ही काही ठराविक लोकांमध्ये सुरू केलेली एक साखळी पद्धत असते
2) जर भिशीमध्ये 20 सदस्य असतील तर त्याची ठराविक रक्कम ही ठरलेली असते. जर एक लाख रुपयाची रक्कम असेल तर ती 20 जणामध्ये विभागलेली असते.
3) त्या रकमेचा लिलाव केला जातो. ज्याला पैशाची गरज असेल तो लिलाव वाढवत जातो. जर त्याला भिशी परवडत असेल तर तो घेतो
भिशीचा लिलाव झालेली रक्कम गरजू सदस्याला देण्यात येते. राहिलेली रक्कमेचे व्याज सगळ्यात विभागून घेतले जाते. असे प्रत्येक महिन्याला एक सदस्य भिशी घेत असतो. पण हे व्याज जास्त असते.

हेही वाचा- उत्तर प्रदेशात जाण्यासाठी पालघरमध्ये उसळली गर्दी; तीन 'श्रमिक ट्रेन'च्या टोकनसाठी झुंबड

हा भिशी प्रकार महिलांमधे, कामगार आणि व्यापारी वर्गात अधिक प्रचलित आहे. कोरोनाचा संकटामुळे रोजगार नसल्यामुळे भिशीचे पैसे बहुतेकजण जमा करत नाहीत. आधीच कोरोनाचे संकट त्यात भिशीचे पैसे मिळत नसल्याने धारावीतील अनेक गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे.

Last Updated : May 20, 2020, 9:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.