न्युयॉर्क - सायबर गुन्हेगार हे कॉम्प्युटरमधील सर्वात सुरक्षित असलेली माहितीही हॅक करू शकत असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. त्यासाठी हॅकर डार्कवेबवर डार्क सुरक्षेची ऑनलाईन सर्टिफिकेटची विक्री करतात.
डार्कवेबवर इंटरनेट सुरक्षित ठेवल्या जाणाऱ्या ऑनलाईन सर्टिफिकेटची विक्री होत आहे. यामध्ये सुरक्षा तंत्रज्ञान असलेल्या एसएसएल आणि टीएलएसची सर्टिफिकेटचा समावेश आहे. याचा पर्दाफाश जॉर्जिया स्टेट युनिव्हर्सिटी आणि द स्टेट ऑफ सर्रेच्या संशोधकांनी केला आहे. यातून कॉम्प्युटरमधून सर्व्हरला पाठविला जाणारा डाटा सुरक्षित ठेवला जातो.
काय आहे एसएसएल आणि टीएलएस सर्टिफिकेट-
नेटवर्क मशिन एसएसएल आणि टीएलएस सर्टिफेकेटचा अधिकृत वापर करतात. त्यानंतरच कॉम्प्युटरला कनेक्टिव्हिटी केली जाते. हे ऑनलाईन युझरनेम आणि पासवर्ड वापरण्यासारखे असते. हे सर्टिफिकेट इंटरनेटवर विश्वासहर्ता आणि गोपनीयता ठेवण्यासाठी असतात. पण त्यांची विक्री करताना या सर्टिफिकेटचा वापर सायबर गुन्हेगार शस्त्रासारखा करत असल्याचा इशारा संशोधकांनी दिला आहे.
काय आहे डार्कवेब-
डार्कवेब म्हणजे हे गोपनीय पद्धतीने चालणारे इंटरनेटविश्व आहे. त्यासाठी वेगळे ब्राऊझर असतात. या डार्कवेबमध्ये नेहमीच्या दिसणाऱ्या अनेक वेबसाईट असतात. अनेक गुन्हेगार या डार्कवेबचा वापर अंमली पदार्थांची विक्रीसारख्या गुन्ह्यासाठीदेखील करतात.
असा चोरला जातो तुमचा डाटा-
ही सर्टिफिकेट डार्कनेटवर ऑनलाईन विकली जातात. यामध्ये क्राईमवेअरसारखी सर्टिफिकेट आहेत. यातून मशीनची सायबर गुन्हेगारांना माहिती मिळते. त्याचा उपयोग खोट्या कंपनी अथवा संस्थांच्या वेबसाईट तयार करण्यासाठी होतो. तसेच संवेदनशील डाटा चोरणे अशा बेकायदेशीर कृत्यांचा वापर केला जातो. टीएसएल सर्टिफिकेट ही वेब डिझाईन सेवासारख्या पॅकेजसोबत दिली जात असल्याचे संशोधकांना आढळून आले आहे. ही माहिती जॉर्जिया स्टेटचे असोसिएशट प्रोफेसर डेव्हिड मेरमोन यांनी दिली.