नवी दिल्ली - केंद्र सरकारने दिवाळीच्या आधीच लाखो कर्मचाऱ्यांना भेट दिली आहे. सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (डीए) ५ टक्क्यांनी वाढ केली आहे. यामुळे ५० लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना फायदा होणार असल्याचे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा १२ टक्क्यावरून १७ टक्के करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा माहिती देताना प्रकाश जावडेकर यांनी वाढीव महागाई भत्त्याचा सुमारे ६२ लाख पेन्शनधारकांना फायदा होणार असल्याचे सांगितले.
हेही वाचा-पीएमसी बँक ग्राहकांचे न्यायालयाबाहेर आंदोलन; कॅन्सर पीडितेचाही समावेश
वाढीव ५ टक्के महागाई भत्त्यासाठी सरकार अतिरिक्त १६ हजार कोटी रुपये देणार आहे. यापूर्वी दोन ते तीन टक्क्यांनी केंद्र सरकारने महागाई भत्त्यात वाढ केली होती. केंद्र सरकारने पहिल्यांदाच सरकारने ५ टक्क्यांनी महागाई भत्ता वाढविला आहे. या निर्णया केंद्रीय कर्मचारी व पेन्शनधारकांना जूलै २०१९ पासून लाभ मिळणार आहे.
-
DA for government employees increased by 5 %.
— PIB India (@PIB_India) October 9, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Around 50 lakh central government employees and 62 lakh pensioners to be benefited: Union Minister @PrakashJavdekar pic.twitter.com/W8BdKkdpGw
">DA for government employees increased by 5 %.
— PIB India (@PIB_India) October 9, 2019
Around 50 lakh central government employees and 62 lakh pensioners to be benefited: Union Minister @PrakashJavdekar pic.twitter.com/W8BdKkdpGwDA for government employees increased by 5 %.
— PIB India (@PIB_India) October 9, 2019
Around 50 lakh central government employees and 62 lakh pensioners to be benefited: Union Minister @PrakashJavdekar pic.twitter.com/W8BdKkdpGw
हेही वाचा-स्टेट बँकेकडून बचत करणाऱ्यांना झटका; ठेवीवरील व्याजदरात कपात