ETV Bharat / business

स्थावर मालमत्ता क्षेत्राला तत्काळ मदत करा- क्रेडाईची पंतप्रधानांकडे मागणी

कोरोनाच्या संकटामुळे अत्यंत तणावाची स्थिती उत्पन्न होत आहे. स्थावर मालमत्ता क्षेत्राला तत्काळ दिलासा द्यावा, अशी क्रेडाईने पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून मागणी केली आहे. या क्षेत्रातील ५ कोटी कामगारांना अन्न आणि निवारा देण्यासाठी उत्तम प्रयत्न केल्याचा दावा संघटनेने केला.

स्थावर मालमत्ता क्षेत्र
स्थावर मालमत्ता क्षेत्र
author img

By

Published : May 25, 2020, 8:04 PM IST

नवी दिल्ली - स्थावर मालमत्ता क्षेत्राची संघटना असलेल्या क्रेडाईने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून तात्काळ मदत करण्याची विनंती केली आहे. सरकारने मदत करून स्थावर मालमत्ता क्षेत्राला वाचवावे, असे पत्रात संघटनेने म्हटले आहे.

कोरोनाच्या संकटामुळे अत्यंत तणावाची स्थिती उत्पन्न होत आहे. स्थावर मालमत्ता क्षेत्राला तत्काळ दिलासा द्यावा, अशी क्रेडाईने पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून मागणी केली आहे. या क्षेत्रातील ५ कोटी कामगारांना अन्न आणि निवारा देण्यासाठी उत्तम प्रयत्न केल्याचा दावा संघटनेने केला.

हेही वाचा-सोन्याची आयात 'फिक्कट'; सलग पाचव्या महिन्यात १०० टक्क्यांची घसरण

या आहेत क्रेडाईच्या मागण्या

  • सरकारने कर्जफेडीसाठी तीन महिन्यांची मुदतवाढ दिल्याने मदत होणार आहे.
  • जागतिक आर्थिक मंदीच्या काळात आरबीआयने एकवेळ कर्ज पुनर्रचना योजना २००८ मध्ये आणली होती. तशी योजना पुन्हा स्थावर मालमत्ता क्षेत्रासाठी लागू करावी, असे संघटनेने म्हटले आहे.
  • केंद्र सरकारने सर्व बँका, बिगर बँकिंग वित्तीय संस्था (एनबीएफसी), गृहकर्ज देणाऱ्या कंपन्यांना अतिरिक्त २० टक्के देण्याची परवानगी द्यावी, अशी क्रेडाईने मागणी केली आहे.
  • त्या कर्जाला गरज लागली तर कर्जाने हमीही द्यावी, असे संघटनेने म्हटले आहे.

हेही वाचा-टाळेबंदीतही उद्योगांची भरभराट; आयटीसीकडून सनराईज फूड्सची 'एवढ्या' किमतीला खरेदी

कोरोनाच्या संकटापूर्वीही स्थावर मालमत्ता क्षेत्रात घसरण सुरू होती, असेही क्रेडाईने म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.