नवी दिल्ली - राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) महामार्गांवरील टोल वसुली आजपासून सुरू केली आहे. टाळेबंदीच्या दुसऱ्या टप्प्यात केंद्र सरकारने काही अटींवर उद्योग सुरू करण्यास आजपासून परवानगी दिली आहे.
नवी दिल्लीमधील बादरपूर व मुंबईमधील वाशीजवळही टोल नाक्यांवरून टोल घेतला जात आहे. टोल कर्मचारी हे कामावर परतले आहेत. केंद्र सरकारने २५ मार्चला टाळेबंदी लागू केली आहे. टाळेबंदी १५ एप्रिलला संपत असताना ती ३ मेपर्यंत वाढविली आहे.
हेही वाचा-टाळेबंदीत अक्षय तृतीया : सोने खरेदीकरिता 'या' ज्वेलर्सने दिला ऑनलाईन पर्याय
केंद्रीय गृहमंत्रालयाने १५ एप्रिलला टाळेबंदीत सुरू करण्यात येणाऱ्या उद्योगांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. मात्र, कंटेनमेंट झोन आणि हॉटस्पॉटमध्ये उद्योग आणि इतर सेवा सुरू होणार नाहीत.
हेही वाचा-शेअर बाजार खुला होताना निर्देशांक ४०० अंशांनी वधारला: 'या' कंपन्यांचे वधारले शेअर