नवी दिल्ली - कोरोनाच्या लढ्याकरता लार्सन अँड टुर्बो (एल अँड टी) कंपनी ४० कोटींचे पीपीई, एन९५ मास्क असे वैद्यकीय साधने राज्यांना व केंद्र सरकारला देणार आहे. यापूर्वी कंपनीने कंत्राटी कामगारांना दर महिन्याला ५०० कोटी रुपयांची मदत करण्याची तरतूद केली आहे. तर पीएम केअर्स ३० कोटी रुपयांची मदत केली आहे.
एल अँड टी कंपनीकडून ४५ हजार पीपीई, १ लाख ५१ हजार एन ९५ मास्क आणि १५५ डायगोन्स्टिक किट देण्यात येणार आहेत. या वैद्यकीय साधनांची अंदाजित किंमत ४० कोटी रुपये आहे. कंपनीचे सीईओ एस. एन. सुब्रमण्यन म्हणाले, की जबाबदार कॉर्पोरेट नागरिक या नात्याने आम्ही कोरोनाचा लढा प्रभावीपणे लढण्याकरता मदत करत आहोत.
हेही वाचा-बँकांना मोठा दिलासा; एलसीआरचे प्रमाण १०० टक्क्यांवरून ८० टक्के करण्याचा निर्णय
कंपनीकडून पीपीई हे महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरात, बिहार, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, आसाम आणि तेलंगणा राज्यांना देण्यात येणार आहेत. कोरोनाच्या रोज १५ हजार ५०० कोरोना टेस्ट घेण्याकरिता कंपनी पुण्याच्या मायलॅब डिस्कव्हरी सोल्यूशन्सकडून किट्स घेणार आहे. या किट्स राज्यांसह केंद्र सरकारला देण्यात येणार आहेत. एल अँड टीने मुंबईमधील ८ हजार लोकांना तयार अन्न पुरविले आहे. तर १ हजार ९६६ लोकांना किराणा माल दिला आहे. तर चेन्नईमध्ये सरकारी रुग्णालयातील डॉक्टर, स्वच्छता कर्मचारी व रुग्णांचे नातेवाईक यांना रोज अन्न दिले जात आहे.
हेही वाचा-कोरोनाचे संकट : जगभरातील १०० हून अधिक देशांनी आयएमएफकडे मागितली मदत