शिमला (हिमाचल प्रदेश)- कोरोना महामारीमुळे देशातील पर्यटन क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. पर्यटन क्षेत्राशी संबंधित अनेकजणांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. शिमल्यातील अनेक पर्यटन उद्योग बंद पडल्याने पर्यटन क्षेत्रात काम करणारे अनेकजण बेरोजगार झाले आहेच.
देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी लागू केल्यानंतर अनेक उद्योग बंद झाले होते. तेव्हापासून अडचणीत सापडलेले पर्यटन क्षेत्र सावरलेले नाही. विशेषत: पर्यटन क्षेत्रावरच सर्व अर्थकारण अवलंबून असल्याने शिमला शहराला मोठा फटका बसला आहे. हॉटेल, आदरातिथ्य, टॅक्सी अशा विविध ठिकाणी काम करणाऱ्या लोकांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. पर्यटन क्षेत्रातील लोकांना सरकारने मदत करावी, अशी उद्योगाची मागणी आहे.
दरम्यान, सरकारने पर्यटन आणि उद्योग क्षेत्राला चालना देण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी पर्यटन क्षेत्रातील शिखर संघटना फेथने मागणी केली आहे.