नवी दिल्ली - विमान वाहतुकीचे नियमन करणाऱ्या डीजीसीएने देशांतर्गत विमान उड्डाणे १४ एप्रिलपर्यंत स्थगित केली आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित केल्याने डीजीसीएने हा निर्णय घेतला आहे.
नुकतेच विमान वाहतूक महासंचालकांनी देशातील सर्व मार्गावरील विमान सेवा २५ मार्च ते ३१ मार्चपर्यंत स्थगित केली होती. नव्या आदेशाप्रमाणे देशातील सर्व विमान कंपन्यांना नियमाचे पालन करणे बंधनकारक असेल, असे डीजीसीएने अध्यादेशात म्हटले आहे.
हेही वाचा-आयटीसी कंपनी केवळ जीवनावश्यक वस्तुंचे करणार उत्पादन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी २१ दिवस देशात लॉक डाऊन जाहीर केले आहे. कोरोनाचा सर्वात मोठा परिणाम विमान वाहतूक उद्योगावर झाला आहे. त्यामुळे उद्योगाने सरकारकडे मदतीची मागणी केली आहे. देशात सुमारे ७२४ जणांना कोरोनाची लागण झालेली आहे. तर १७ जणांचा मृत्यू तर ६६ रुग्ण बरे झाले आहेत.
हेही वाचा-जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा सुरळित राहण्यासाठी सरकारने घेतली ई-कॉमर्स कंपन्यांची बैठक