ETV Bharat / business

कोरोनावरील उपचारात कोरोनील वापरता येणार नाही- आयएमए - IMA president Jayesh Lele news

सेंट्रल ड्रग स्टँण्डर्ड कंट्रोल ऑरगानायझेशनने (सीडीएससीओ) माहिती अधिकारात विचारलेल्या प्रश्नात कोरोनीलबाबत स्पष्टीकरण दिले आहे. या कार्यालयाने कोरोनीलला कोरोनाबाधितावर उपचार करण्यासाठी परवानगी अथवा प्रमाणपत्र दिले नसल्याचे कार्यालयाने माहिती अधिकारावरील उत्तरात म्हटले आहे.

Indian Medical association
इंडियन मेडिकल असोसिएशन
author img

By

Published : Mar 19, 2021, 8:27 PM IST

नवी दिल्ली - बाबा रामदेव यांनी उत्पादित केलेल्या कोरोनीलचा कोरोना महामारीच्या काळात प्रतिबंधात्मक आणि उपचारासाठी वापर करणे हा वादाचा मुद्दा ठरत आहे. यावर भारतीय औषध नियामक संस्थेने कोरोनीलला हे कोरोनाबाधितावर उपचार करण्यासाठी प्रमाणपत्र व परवानगी दिली नसल्याचे स्पष्ट केले आहे.

सेंट्रल ड्रग स्टँण्डर्ड कंट्रोल ऑरगानायझेशनने (सीडीएससीओ) माहिती अधिकारात विचारलेल्या प्रश्नात कोरोनीलबाबत स्पष्टीकरण दिले आहे. या कार्यालयाने कोरोनीलला कोरोनाबाधितावर उपचार करण्यासाठी परवानगी अथवा प्रमाणपत्र दिले नसल्याचे कार्यालयाने माहिती अधिकारावरील उत्तरात म्हटले आहे. औषध नियंत्रणक सुशांता सरकार यांनी दिव्या फार्मसी युनिट (२) हरिद्वार येथील कंपनीला दिव्य कोरोनील टॅबलेटची परवानगी देताना आयुष्य मंत्रालयाशी चर्चा केली होती.

हेही वाचा-टीसीएसकडून कोरोना महामारीतही कर्मचाऱ्यांना दुसऱ्यांदा वेतनवाढ

आयएमएकडून कोरोनीलवर प्रश्न उपस्थित-

इंडियन मेडिकल असोसिएशनचे महासचिव जयेश मनोहर लेले म्हणाले की, आयुर्वेदिक औषधांचे नियमन हे ड्र्ग्ज आणि कॉस्मेटिक अॅक्ट १९४० आणि नियम १९४५ कायद्यानुसार करण्यात येते. काही टॅबलेटचा कोरोनाबाधितावरील उपचार करण्याबाबत आयएमएने प्रश्न उपस्थित केले होते. अशा टॅबलेटचा वापर उपचारात्मक व प्रतिबंधात्मक म्हणून करण्याचा जाहिरातीमधून दावा केला जात आहे. त्यावरही आयएमएनेही प्रश्न उपस्थित केले होते.

हेही वाचा-सोन्याच्या दरात १६८ रुपयांची वाढ; चांदीत १३५ रुपयांची घसरण

चुकीच्या आशेने कोरोनाचा अधिक संसर्ग वाढू शकतो-

शुद्ध आयुर्वैदिक औषधांचे प्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी असलेले महत्त्व आयएमएला माहित आहे. मात्र, संसर्ग असलेल्या व्यक्तींवर त्याचा उपचारात्मक करण्याचा दावा हा धोकादायक आहे. कोरोनाच्या काळात अधिक दक्षात घेण्याची गरज आहे. चुकीच्या आशेने कोरोनाचा अधिक संसर्ग वाढू शकतो. त्यामुळे लोकांनी खोट्या दाव्यांना बळी पडू नये, असे आवाहन डॉ. जयेश लेले यांनी केले. देशात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना लस घ्यावी, असे आवाहनही डॉ. लेले यांनी केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.