मुंबई - महामारी कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने देशातील ५० टक्क्यांहून अधिक कंपन्यांच्या कामकाजावर परिणाम झाला आहे. तर ८० टक्क्यांहून अधिक कंपन्यांच्या उत्पन्नावर परिणाम झाल्याचे सर्व्हेमधून दिसून आले आहे.
महामारीने देशातील अर्थव्यवस्थेसमोर नवे आव्हान उभे ठाकले आहे. महामारीनंतर मागणी आणि पुरवठा साखळी विस्कळित झाली आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेचा विकासदर आणखी घसरणार असल्याचे फिक्की या संघटनेच्या सर्व्हेमधून दिसून आले आहे. यापूर्वीच मंदावलेल्या अर्थव्यवस्थेमुळे विविध क्षेत्र संकटामधून जात आहेत. चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत ४.७ टक्के विकासदराची नोंद झाली आहे. हा विकासदर गेल्या सहा वर्षातील सर्वात कमी आहे.
हेही वाचा - सीएआयटीचा 'जनता कर्फ्यू'ला पाठिंबा, देशभरात रविवारी बंद राहणार दुकाने
देशातील ५३ टक्के उद्योगांवर कोरोनाचा पहिल्या टप्प्यातच परिणाम झाल्याचे फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजने (फिक्की) म्हटले आहे.
हेही वाचा - उद्योगांना आर्थिक पॅकेज मिळण्याची शक्यता; पंतप्रधानांकडून टास्क फोर्सची घोषणा