नवी दिल्ली/लखनौ - प्राणघातक कोरोनाने जगभरात थैमान घातल्यानंतर भारतात प्रवेश केला आहे. देशात तीन रुग्ण आढळल्यानंतर अनेक उद्योगांवर याचा परिणाम होण्यास सुरुवात झाली आहे.
आग्र्याच्या ताजमहालला भेट द्यायला येणाऱ्या पर्यटकांमध्ये विदेशी नागरिकांची संख्या लक्षणीय असते. इटली, इराण आणि चीनमधील पर्यटकांची पहिल्यांदा मुख्य आरोग्य अधिकाऱ्याला माहिती द्यावी, अशी सूचना हॉटेल आणि पर्यटनस्थळांच्या यंत्रणेला देण्यात आली आहे.
पर्यटकांना कोविड-१९ ची लक्षणे दिसत असल्याच त्यांची तपासणी करण्यासाठी डॉक्टरांची पथक नेमण्यात आले आहे. ही माहिती आग्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. मुकेश वत्स यांनी दिली. ते म्हणाले की, हॉटेलमध्ये जावून डॉक्टर पर्यटकांची तपासणी करत आहेत. कोरोना विषाणुबाबत भारत सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. इटली, इराण, दक्षिण कोरिया आणि जपानहून येणाऱ्या पर्यटकांचे व्हिसा रद्द करण्यात आले आहेत. यापूर्वी सरकारने चीनमधून येणाऱ्या प्रवाशांचे व्हिसा आणि ई-व्हिसा रद्द केले आहेत.
हेही वाचा-७,७९६ कोटी रुपयांची खोटी जीएसटी बिले: अधिकाऱ्यांकडून 'गोरखधंदा' उघडकीस
शिओमीने मार्चमधील उत्पादनांचे लाँचिंग केले रद्द
देशामधील काही भागांत कोविड-१९ चे रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर मार्चमधील उत्पादनांचे लाँचिंग रद्द केल्याचे शिओमी इंडियाचे प्रमुख मनूकुमार जैन यांनी सांगितले. यामागे चाहते, माध्यमातील मित्र, कर्मचारी आणि भागीदार सुरक्षित राहावे, असा हेतू आहे. तुम्ही सुरक्षित राहावे, अशी विनंती आहे, असे जैन यांनी ट्विट केले.
हेही वाचा-कोरोनाशी 'लढाई' : २६ क्रियाशील औषधी घटकांच्या निर्यातीवर निर्बंध
आरोग्य मंत्रालयाच्या आचारसंहितेचे पालन करा - एअर इंडिया
देशामध्ये एका विमान प्रवाशाला २५ फेब्रुवारी रोजी कोव्हिड-१९ ची लागण झाली. त्यांच्यासमवेत प्रवास करणाऱ्यांनी आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आचारसंहितेचे पालन करावे, असे एअर इंडियाने म्हटले आहे. कोरोनाबाधित प्रवासी हा एआय १५४ व्हिएन्ना ते दिल्ली या विमानाने प्रवास करत होता.