मुंबई - टाळेबंदीत वाहतुकीवर निर्बंध आल्याने श्रेणी - 2 आणि श्रेणी - 4 शहरांमधील गोदामांचे महत्त्व वाढले आहे. या शहरामध्ये गोदामांसाठी गुंतवणूकदार पसंती देणार असल्याचे उद्योगतज्ज्ञांनी सांगितले.
गोदाम क्षेत्राचा मुख्यत: श्रेणी - 1 शहरांत विशेषत: महानगरांमध्ये भर देण्यात येतो. या क्षेत्रातील गुंतवणूकदारांनी सरकारच्या धोरणातील बदलानंतर श्रेणी - 2 शहरांकडे वळण्यास सुरुवात केली होती. शहरीकरणासह विविध कारणांमुळे गोदामे ही मुख्य आठ महानगरांमध्ये केंद्रित झाली होती. मात्र, देशभरातील टाळेबंदीनंतर लहान शहरे ही गोदामांचे हब होऊ शकतात, असे मत मालमत्ता सल्लागार कंपनी सॅव्हिल्स इंडियाचे संशोधक प्रमुख अरविंद नंदन यांनी सांगितले.
हेही वाचा-वीज कंपनीतील कर्मचारी 1 जूनला पाळणार 'निषेध दिन'; 'हे' आहे कारण
या आर्थिक वर्षात नवे एकूण 45 दशलक्ष स्क्वेअर फुटांचे नवीन गोदामे असतील, असा अंदाज होता. मात्र, कोरोनाचे संकटामुळे केवळ 12 दशलक्ष स्क्वेअर फुटांची नवीन गोदामे सुरू होतील, असे नंदन यांनी सांगितले.
हेही वाचा-पार्ले कंपनीसमोर अपुऱ्या मनुष्यबळाचे आव्हान; सरकारकडे 'ही' केली मागणी
असे असले तरी दीर्घकाळासाठी नव्या गोदामांची संख्या श्रेणी -2 आणि श्रेणी -3 शहरांत वाढतील, असे त्यांनी सांगितले. कोरोनाच्या संकटामुळे गोदाम उद्योगात नव्या संधी निर्माण झाल्याचे वॉरबग पिन्कसबरोबर भागीदारी असलेल्या इएसआर इंडियाचे प्रमुख अभिजीत मालकणी यांनी सांगितले.