नवी दिल्ली - चलो कुछ आज कुछ तुफानी करें, अशी जाहिरात करणाऱ्या कोका कोला इंडियाने कोरोनाच्या लढ्यात भरीव मदत करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. कोका कोला कोरोनाच्या लढ्याविरोधात मदत करण्यासाठी १ अब्ज रुपये देणार आहे.
कोरोनाच्या संकटात दिलासा देण्याकरता देशातील १० लाख लोकांहून अधिक लोकांना मदत करण्याचे उद्दिष्ट असल्याचे कोका कोलाने म्हटले आहे. देशातील आरोग्याच्या पायाभूत सुविधांसाठी तातडीने मदत करण्यात येणार असल्याची कंपनीने ग्वाही दिली आहे. यामध्ये कोरोना चाचणीची सुविधा व आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी पीपीईची सुविधा आदींचा समावेश आहे. याशिवाय विविध एनजीओ आणि बॉटलिंग भागीदांराबरोबर करत असल्याचे कंपनीने म्हटले आहे. यामध्ये स्थलांतरित मजूरांना जेवण आणि पिण्याच्या बॉटल यांचा समावेश आहे.
हेही वाचा-थ्रीडी तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केले 'मास्क'; जळगावातील विद्यार्थ्यांचा अविष्कार
कंपनीचे कर्मचारीही गिव्हइंडिया या एनजीओबरोबर भागीदारी करत मदतनिधी देणार आहेत. हा मदतनिधी स्वच्छता कर्मचारी आणि कचरावेचक कर्मचाऱ्यांसाठी देण्यात येणाऱ्या अन्न आणि स्वच्छतेची साधनांसाठी वापरण्यात येणार आहे. जेवढे कर्मचारी योगदान देणार आहेत, तेवढेच योगदान कंपनीकडून देण्यात येणार आहे.
हेही वाचा-आयसीएमआरने टेस्ट किट परत करण्याच्या निर्णयावर चीनने 'ही' दिली प्रतिक्रिया