हैदराबाद - टाळेबंदी ५. ० खुली होताना केंद्र सरकारने परवानगी देऊनही प्रेक्षकांनी चित्रपटगृहांकडे पाठ फिरविली आहे. नवीन चित्रपट प्रदर्शित झाले नसल्याने प्रेक्षक चित्रपटगृहांकडे आकर्षित होत नसल्याचा दावा चित्रपटगृह मालकांनी व्यक्त केला आहे.
टाळेबंदी खुली करताना केंद्र सरकारने चित्रपटगृहे ५० टक्के क्षमतेने खुली करण्याची परवानगी दिली आहे. असे असले तरी चित्रपटगृह मालकांना प्रेक्षकांची प्रतिक्षा करावी लागत आहे. आयनॉक्स लीझरचे सीईओ आलोक टंडन हे ईटीव्ही भारतशी बोलताना म्हणाले, की आयनॉक्स ही देशातील सर्वात मोठी मल्टीप्लेक्स चित्रपटगृहांची साखळी आहे. देशातील ६८ शहरात १४७ मल्टीप्लेक्स आणि ६२६ स्क्रीन आहेत. मात्र, दहापेक्षा कमी प्रेक्षक चित्रपटगृहात येत असल्याचे दिसून आले आहे.
नवीन चित्रपट नसल्याने नेहमीप्रमाणे देशातील चित्रपटगृहे अजून सुरू झालेली नाहीत. नवीन चित्रपटगृहे प्रदर्शित होणे ही उद्योगासाठी मोठी चालना ठरणार आहे. पश्चिम बंगालमध्ये नवीन चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. त्याचा परिणाम म्हणून पश्चिम बंगालमध्ये चित्रपटगृहांचे व्यवसाय सुरळित सुरू झाले आहेत. त्यामुळे प्रेक्षकांनी चित्रपटगृहात गर्दी करण्यासाठी नवीन चित्रपटांची गरज अधोरेखित होते. राज्य सरकारांनी चित्रपटगृहांसाठीचे निर्बंध शिथील करावे, अशी चित्रपट निर्मात्यांची अपेक्षा आहे. त्यासाठी चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी राज्यांच्या मार्गदर्शक सूचनांची निर्माते प्रतिक्षा करत आहेत.
राज्यांकडून चित्रपटगृहांवर निर्बंध कायम-
केंद्र सरकारने चित्रपटगृहे ५० टक्के क्षमतेने खुली करण्याची १५ ऑक्टोबरला परवानगी दिली आहे. मात्र, अनेक राज्यांनी चित्रपटगृहे सुरू करण्याची परवानगी दिली आहे. महाराष्ट्र सरकारने आठवडाभरापूर्वी चित्रपटगृहे सुरू करण्याची परवानगी दिली आहे.