ETV Bharat / business

अमेरिकेच्या निवडणुकीवर 'या' हॅकर्सचा डोळा: गुगलचा इशारा - अमेरिकन अध्यक्षपद निवडणूक

चीन आणि इराणच्या सरकारी संस्थांचा पाठिंबा असलेले हॅकर्स हे डेमॉक्रेटिक आणि रिपब्लिकन पक्षाच्या निवडणूक मोहिमांना लक्ष करणार आहेत. गुगलचे अधिकारी शेन हंटले यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.

Google
गुगल
author img

By

Published : Jun 5, 2020, 12:25 PM IST

वॉशिंग्टन- अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक नोव्हेंबरमध्ये पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर चीन आणि इराणमधील हॅकर्स हे डोनाल्ड ट्रम्प आणि बिडेन यांच्या निवडणूक मोहिमेला लक्ष्य करणार आहेत, असा इशारा गुगलने दिला आहे.

चीन आणि इराणच्या सरकारी संस्थांचा पाठिंबा असलेले हॅकर्स हे डेमॉक्रेटिक आणि रिपब्लिकन पक्षाच्या निवडणूक मोहिमांना लक्ष करणार आहेत. गुगलचे वरिष्ठ अधिकारी शेन हंटले यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.

ही माहिती अमेरिकेच्या अंमलबजावणी संस्थेला दिल्याचेही गुगलने म्हटले आहे.

रशियाचा पाठिंबा असलेल्या हॅकर्सने 2016 मध्ये अमेरिकेच्या निवडणुकीत हस्तक्षेप केल्याचा यापूर्वी आरोप करण्यात आला होता. अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उमेदवार असलेले बिडेन यांच्या प्रवक्त्याने गुगलच्या इशार्‍यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, सुरुवातीपासूनच आम्हाला हॅकरचे हल्ले होतील, अशी कल्पना आहे. त्यासाठी आम्ही तयारी केली आहे.

ट्रम्पच्या प्रवक्त्याने अद्याप गुगलच्या इशाऱ्यावर प्रतिक्रिया दिलेली नाही. साधारणतः हॅकर्सकडून फिशींग ईमेल्स वापरकर्त्यांना पाठवले जातात. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर वापरकर्त्यांकडून माहिती मागविली जाते. त्यानंतर वापरकर्त्यांची गोपनीय माहिती हॅकर्सकडून घेतली जाते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.