शांघाय – चीनच्या कृत्रिम मानवी बुद्धिमत्ता क्षेत्रातील कंपनीने अॅपल कंपनीवर 1.43 अब्ज डॉलरचा दावा केला आहे. अॅपल कंपनीने स्मार्ट असिस्टंट असलेल्या सिरीमध्ये पेटंट वापरल्याचा चीनी कंपनीने दावा केला आहे.
शांघाय झिझेन नेटवर्क कंपनी असलेल्या शिआओ-आयने शांघायमधील न्यायालयात अॅपल कंपनीविरोधात दावा दाखल केला आहे. या कंपनीने आयफोनच्या निर्मितीत नुकसान झाल्याने अॅपलकडे 1.43 अब्ज डॉलरची मागणी केली आहे.
कंपनीने लिंकडिनवर पोस्ट करत अॅपलला उत्पादन, विक्री थांबविण्याचे आणि आयात केलेल्या उत्पादनात छेडछाड थांबविण्याची मागणी केली आहे. जर कंपनीचा दावा यशस्वी झाला तर अॅपलच्या अनेक उत्पादनांवर चीनमध्ये निर्बंध येवू शकणार आहेत. शिआओ-आय कंपनीचे व्हर्च्युअल अस्टिंटचे पेटंट चीनमध्ये वैध असल्याचा निकाल चीनच्या सर्वोच्च न्यायालयाने जूनमध्ये निकाल दिला.
आवाज ओळखण्याच्या तंत्रज्ञानासाठी शिआओ-आय कंपनीने पेटंट असलेले तंत्रज्ञान विकसित केले आहे. या तंत्रज्ञानाचा अॅपलकडून वापर होत असल्याचे चिनी कंपनीचा दावा आहे. जरी चिनी कंपनीचे पेटंट अवैध असले तरी अॅपलच्या सिरीवर निर्बंध लागू होणार नाहीत, असे सर्वोच्च न्यायालयाने निकालात म्हटले होते. सध्या, शांघायमधील न्यायालयाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. दोन्ही कंपन्यांकडून वापरण्यात येणारे तंत्रज्ञान एक आहे की भिन्न आहे, याचे परीक्षण करून शांघायचे न्यायालय निकाल देणार आहे.