ETV Bharat / business

भारताला औषधी उद्योगात 'आत्मनिर्भर' होण्यापासून रोखण्याकरता चीनची नवी खेळी

जगाचा चीनवर रोष असताना अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या चीनवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तर, अशावेळी इतर देशामधून खरेदी होवू नये, यासाठी चीन प्रयत्न करत आहे.

अंकलेश्वर उद्योगसमूह
अंकलेश्वर उद्योगसमूह
author img

By

Published : May 30, 2020, 12:55 PM IST

नवी दिल्ली - सर्ग जग महामारीच्या उद्रेकाने त्रस्त असताना चीनच्या कुरापती सुरू आहेत. भारताला औषध निर्मिती क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यापासून रोखण्यासाठी चीनने नवी खेळी सुरू केली आहे. चीनने औषधांमध्ये वापरलेला कच्चा माल कमी किमतीत भारताला निर्यात करण्यास सुरुवात केली आहे.

चीनमधील वुहान येथून जगभरात कोरोना पसरला आहे. सध्या, वुहानमधील उद्योग पूर्ववत सुरू झाले आहेत. तर अमेरिका भारतासह जगभरातील उद्योग ठप्प झाले आहेत. अशावेळी जगाचा चीनवर रोष असताना अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या चीनवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तर, अशावेळी इतर देशामधून खरेदी होवू नये, यासाठी चीन प्रयत्न करत आहे.

चीनमधील वुहान आणि जिहानग्सू येथून सक्रिय घटकद्रव्यांची (एपीआय) निर्यात भारतात करण्यास सुरुवात झाली आहे. अंकलेश्वर येथे देशामधील सर्वात मोठे १ हजारहून अधिक औषधी कंपन्या आणि रसायन उद्योग आहेत. चीनमधून कच्चा माल आल्याशिवाय येथील उद्योगांचे उत्पादन होवू शकत नाही.

हेही वाचा-आठ मूलभूत क्षेत्रांच्या वृद्धीदरात ३८.१ टक्क्यांची घसरण

चीनकडून औषधांसाठी लागणारा ४२.४ अब्ज कोटी रुपयांचा कच्चा माल पाठविण्यात येतो. हे देशातील औषधी उद्योगांच्या मागणीच्या ७० टक्के आहे. चीनमधून भारत ३५४ सक्रिय घटकद्रव्य आणि औषधांचे इंटरमिडियट्स आयात करण्यात येतात.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि भारतीय उद्योगाकडून औषधी उद्योगांना आत्मनिर्भर होण्यासाठी मोठ्या सवलती देण्यात येतात.

हेही वाचा-'जीडीपीचे आकडे हे सरकारच्या चुकीच्या आर्थिक व्यवस्थापनाचे समालोचन'

अंकलेश्वर उद्योगातील प्रवक्ते आणि चीनमधील कच्च्या मालाचे आयातदार प्रवीण तरैया यांनी ईटीव्ही भारतची संवाद साधला. ते म्हणाले, की काही कालावधीनंतर वुहानने मोठ्या प्रमाणात आणि वेगाने रसायानांचा पुरवठा करण्यास सुरुवात केली आहे. चीनने त्यांच्या औषधांच्या किमती कमी करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे भारताने काही उत्पादनांचे थांबविले होते. त्यानंतरही चीनने त्यांच्या औषधांच्या किमती करण्यास सुरुवात केली आहे. भारतामधील नवउद्योजकाने औषधी उत्पादनाकडे वळू नये, अशी त्यामागे चीनची भूमिका आहे. चीनने औषधी उद्योगात जागतिक बाजारपेठेत वर्चस्व निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.