बीजिंग - चालू आर्थिक वर्षात चीनच्या विकासदरात घट झाली आहे. चीनने ६ ते ६.५ टक्के विकासदर निश्चित केल्याचे चीनचे पंतप्रधान ली केक्वीयांग यांनी स्पष्ट केले. ते चीनच्या विधिमंडळात बोलत होते.
चीन हे वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था आहे. चीनने करासह व्यावसायाला लागणाऱ्या शुल्कात २ लाख कोटी युआन रक्कमेची कपात करण्याचा निर्णय घेतल्याचे माध्यमांनी म्हटले आहे. यातून बँकांकडून कंपन्यासह लघु उद्योगांना देण्याच्या कर्जाच्या प्रमाणात ३० टक्के वाढ होईल, अशी चीन सरकारला अपेक्षा आहे. चीन-अमेरिकेतील व्यापारी युद्धाचा विकास दरावर परिणाम झाल्याचे ली यांनी म्हटले आहे. चीनमधील बाजरपेठेत विदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी त्यांनी इकॉनॉमिक ब्ल्यूप्रिंट जाहीर केली. यातून विदेशी गुंतवणूकदारांना चिनी भागादीरांशिवाय विविध क्षेत्रात गुंतवणूक करणे शक्य होणार आहे.
विदेशी आणि चीनमधील कंपन्यांना समान संधी उपलब्ध करून देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. ही अमेरिकेची मुख्य मागणी होती. नॅशनल पीपल काँग्रेसचे ११ दिवस चालणारे हे अधिवेशन म्हणजे कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांना आणि अधिकाऱ्यांना चीनच्या प्रगतीविषयी सांगण्याची संधीच असते.
चीनच्या अर्थव्यवस्थेचे ६. ५ टक्के एवढा विकासदराचे उद्दिष्ट होते. चीनने ६.६ विकासदर गाठला आहे. प्रत्यक्षात गेल्या तीस वर्षात प्रथमच चीनने विकासदराचा हा नीचांक नोंदविला आहे. २०१९ मध्येही चीनच्या निर्यात, गुंतवणूक या महत्त्वाच्या आर्थिक बाबींवर दबाव राहणार असल्याचा अर्थतज्ज्ञांचा अंदाज आहे.