बीजिंग - कोरोनावरील प्रभावी लस अद्याप जगात तयार झाली नाही. असे असले तरी चीनमधील कंपन्यांकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांना कोरोनावरील लस देण्यात येत आहे. यामध्ये कोरोनाच्या लसीची मानवी चाचणी करणाऱ्या संशोधकांचा समावेश आहे. गेल्या काही महिन्यांत आपत्कालीन परिस्थितीमध्ये संशोधकांनी कोरोनाची लस अनेकांना दिली आहे.
चीनच्या आरोग्य विभागाने म्हटले की, मोठ्या प्रमाणात रोगाचे उच्चाटन करण्यात आले आहे. पुन्हा रोगाची लागण होऊ नये, यासाठी पावले उचलण्याची गरज आहे. मात्र, चीनबाहेरील तज्ज्ञांनी यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. चीनमध्ये विषाणू नसेल तर, लसीचा आपत्कालीन वापर करण्याची काय गरज आहे, असा प्रश्न तज्ज्ञांनी उपस्थित केला आहे. चीनमध्ये किती जणांनी कोरोनाची लस दिली आहे, ही माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.
हेही वाचा- अमेरिकेत टिकटॉकची ओरॅकल, वॉलमार्टशी भागीदारी; 25 हजार अमेरिकन लोकांना नोकऱ्या
चीनची सरकारी कंपनी सिनोफार्मची कंपनी सीएनबीजीने 3 लाख 50 हजार लोकांना कोरोनाची लस मानवी चाचण्याच्या टप्प्यानुसार दिल्या आहेत. तर 40 हजार लोकांनी नोंदण्या केल्याचे सीएनबीजीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
सिनोवॅक कंपनीने त्यांचे एकूण 90 टक्के कर्मचारी व कुटुंबांना लस दिली आहे. ही संख्या 3 हजार असल्याचा अंदाज आहे. ही लस आपत्कालीन तरतुदीनुसार देण्यात आल्याचे सिनोवॅक कंपनीचे सीईओ यीन वाईंगडाँग यांनी सांगितले. तसेच बीजींग शहरात राहणाऱ्या सरकारमधील हजारो लोकांना कोरोनोवॅक ही लस देण्यात आली आहे. चीनचे सैन्यदल आणि जैविक औषधनिर्मिती कंपनी कॅनसिनीने विकसित केलेली ही लस आपत्कालीन गरज म्हणून वापरण्याची चीन सरकारने परवानगी दिली आहे.
हेही वाचा-युक्रेनमध्ये लष्कराचे विमान कोसळले; 25 जणांचा मृत्यू
लसीचे संशोधन करणारे आणि लसीची निर्मिती करणाऱ्यांना लस देण्यात प्राधान्य देण्यात येत आहे. कारण, महामारी आली तर लोकांना संसर्ग झाल्यास लस देण्यासाठी कोणताच पर्याय उपलब्ध होणार नाही, अशी भीती असल्याचे एका स्तंभलेखकाने लेखामधून दिली आहे.
कोरोनाची लस वापरण्यासाठी चीन सरकारने जागतिक आरोग्य संघटनेच्या आपत्कालीन नियमाचा आधार घेतला आहे. या नियमानुसार स्वत:च्या कठोर प्रक्रियेमधून लस देण्यात येत असल्याचे राष्ट्रीय आरोग्य आयोगाचे अधिकारी झेंग झोंगवूई यांनी पत्रकार परिषदेत आज सांगितले.