ETV Bharat / business

तणावाच्या स्थितीत चीनची भारतामधून पीव्हीसी पाईपची विक्रमी आयात - China highest import of PVC from India

चीनकडून होणाऱ्या आयातीचे प्रमाण कमी करण्यासाठी  केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. अशातच चीनकडून होणाऱ्या पीव्हीसीच्या आयातीचे प्रमाण वाढले आहे.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक
author img

By

Published : Jul 29, 2020, 6:47 PM IST

नवी दिल्ली – सीमारेषेवरून तणावाची स्थिती असताना चीनने भारताकडून विक्रमी पीव्हीसी पाईपची आयात केली आहे. चीनने जुनमध्ये भारताकडून 27 हजार 707 मेट्रिक टन पीव्हीसीची पाईप आयात केली आहे.

चीनकडून होणाऱ्या आयातीचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. अशातच चीनमधून होणाऱ्या पीव्हीसीच्या आयातीचे प्रमाण वाढले आहे. चीनने भारताकडून मे महिन्यात 5 हजार 174 मेट्रिक टन पीव्हीसी पाईपची आयात केली होती. त्याच्या तुलनेत जूनमध्ये सुमारे पाचपट पीव्हीसी पाईपची आयात चीनने केली असल्याचे ग्लोबल रबर मार्केटने म्हटले आहे.

टाळेबंदीत भारतामधून आयात होणाऱ्या पीव्हीसी पाईपच्या प्रमाणात घसरण झाली आहे. अनेक देशांनी पीव्हीसी पाईपच्या ऑर्डर रद्द केल्या आहेत.

या कामांसाठी पीव्हीसी पाईपचा होतो वापर

पॉलिविनील क्लोराईडचा (पीव्हीसी) प्लास्टिक उत्पादनात तिसऱ्या क्रमांकावर उपयोग होतो. या पीव्हीसीचा उपयोग उद्योग, बांधकाम, कृषी, उर्जा निर्मिती आदी कामांसाठी होती. पीव्हीसी हे लवचिक असल्याने त्याचा वापर हा पाईपसह इत्यादी उत्पादनात करण्यात येतो.

दरम्यान, आयातीवरील चीनचे अवलंबित्व कमी करण्यासाठी विविध कंपन्यांनी सरकारकडे प्रस्ताव दाखल केले आहे. सरकारने चीनच्या 59 अॅपवर सार्वभौम आणि संरक्षणाच्या विषयावरून निर्बंध लागू केले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.