ETV Bharat / business

अमेरिकेबरोबरील व्यापारी युद्ध लढण्याकरिता चीनला हवीय भारताची साथ - agricultural goods

भारतामधून साखर आणि तांदूळ आयात वाढवण्यासाठी चीन उपाययोजना करत आहे. नुकतीच आलेल्या आकडेवारीनुसार भारतामधून चीनध्ये करण्यात आलेल्या निर्यातीचे प्रमाण १५ टक्क्याने वाढले आहे.

चीन-अमेरिका संबंध
author img

By

Published : Jul 20, 2019, 3:54 PM IST

बीजिंग - भारत-चीनमधील व्यापारी तूट कमी करण्याची तयारी चीनने दाखवली आहे. त्याचबरोबर अमेरिकेच्या हेकेखोर, संरक्षणवाद आणि व्यापारी युद्धाविरोधात भारताने सहभागी व्हावे, अशी चीनने भारताकडून अपेक्षा केली आहे.

चीनमधील औषधी बाजारपेठ खुली करण्यात यावी, अशी भारताची अनेक वर्षापासून मागणी आहे. चीनचे नवे भारतामधील राजदूत सन वाई़डाँग यांनी याबाबत मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले, भारत-चीनमधील व्यापार हा असंतुलित आहे. मात्र, जाणीवपूर्वक असा प्रकार चीनकडून घडलेला नाही, हे मी स्पष्ट करतो.

भारतामधून साखर आणि तांदूळ आयात वाढविण्यासाठी चीन उपाययोजना करत आहे. नुकताच आलेल्या आकडेवारीनुसार भारतामधून चीनध्ये करण्यात आलेल्या निर्यातीचे प्रमाण १५ टक्क्याने वाढले आहे.

गेल्या वर्षी चीनमध्ये भारतामधून शेतमाल निर्यात करण्याचे प्रमाण दुप्पट झाले आहे. चालू आर्थिक वर्षात भारत-चीनमधील व्यापारी तूट ही ५ टक्क्याने कमी झाली आहे. त्यामुळे दोन्ही देशातील व्यापारी असंतुलन कमी होत असल्याचे सन यांनी सांगितले. अमेरिकेबरोबर असलेल्या व्यापारी युद्धाचा थेट उल्लेख न करता त्यांनी शतकभरात पहिल्यांदाच अभूतपूर्व आव्हानाला सामोरे जात असल्याचे सांगितले.

Intro:Body:

biz

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.