ETV Bharat / business

चिकन खाणे सुरक्षित, कोरोनाचा संसर्ग होत नाही- केंद्र सरकार - चिकन

कुक्कुटपालन आणि कुक्कुटपालनाच्या उत्पादने ही सुरक्षित आहेत. असे असले तरी जागतिक आरोग्य संघटना आणि जागतिक प्राणी आरोग्य संस्थेच्या सूचनांप्रमाणे मुलभूत स्वच्छतेच्या तत्वांचे पालन करण्याची गरज आहे.

Poultry farm
कुक्कुटपालन
author img

By

Published : Feb 11, 2020, 12:48 PM IST

नवी दिल्ली - केंद्रीय पशुसंवर्धन मंत्रालयाने चिकण खाणे सुरक्षित असल्याचा खुलासा केला आहे. चिकनमुळे कोरोना विषाणू पसरत असल्याचा कोणताही पुरावा समोर पुढे आला नसल्याचे पशुसंवर्धन मंत्रालयाने म्हटले.

पशुसंवर्धन मंत्रालयाचे आयुक्त प्रविण मलिक यांनी कुक्कुटपाल महामंडळाचे सल्लागार विजय सरदाना यांना पत्र लिहिले. या पत्रात त्यांनी चिकनमधून माणसांमध्ये कोरोनाचा संसर्ग होत असल्याचे जगभरात कुठेही आढळले नसल्याचे म्हटले आहे. सरदाना यांनी याबाबत ई-मेलवरून प्रविण मलिक यांना प्रश्न विचारला होता. जागतिक प्राणी आरोग्य संस्थेच्या माहितीनुसार कोरोना विषाणुचा केवळ माणसातून माणसांना संसर्ग होतो. कोरोनाचा संसर्ग होताना कोणत्याही प्राण्याचा स्त्रोत आढळलेला नाही.

हेही वाचा- कोरोनाचे थैमान : मृतांची संख्या ८०० वर, सार्सच्या बळींचा आकडा ओलांडला

कोरोनाप्रमाणे सार्स हा संसर्गजन्य रोग २००२-०३ मध्ये जगभरात पसरला होता. त्यावेळी कुक्कुटपालन आणि कुक्कुटपालन उत्पादनामधून सार्सचा संसर्ग होत नसल्याचे आढळून आले होते.

हेही वाचा-शेअर बाजार निर्देशांक ३०० अंशांनी वधारला; निफ्टी पोहोचला १२,१५० वर

Intro:Body:

Dummy business news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.