नवी दिल्ली - केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण (CCPA) ने ( GlaxoSmithKline (GSK) Consumer Healthcare Ltd.) सेन्सोडाइन उत्पादनाची भारतात जाहिरात दाखवण्याचे निर्देश दिले आहेत. नियमांचे उल्लंघन केल्यामुळे जाहिरातीवर बंदी घालण्यात आली आहे, असे सीसीपीएने बुधवारी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे. प्राधिकरणाने ( Naaptol Online Shopping Limited ) विरुद्ध त्याच्या उत्पादनांच्या जाहिरातींमध्ये दिशाभूल करणे आणि अनुचित व्यापार वापरल्याबद्दल आदेश जारी केला आहे.
CCPA ने या प्रकरणाची दखल घेतली आणि 27 जानेवारी रोजी (GlaxoSmithKline Consumer Healthcare ) आणि 2 फेब्रुवारी रोजी ( Naaptol ) विरुद्ध आदेश जारी केले. CCPA ने ( GlaxoSmithKline ) ला एका आठवड्यात देशभरात ( Sensodyne ) च्या जाहिरातींवर बंदी घालण्यास सांगितले आहे. या टूथपेस्टचा अवलंब करण्याचा सल्ला बाहेरील देशातील दंतवैद्य देत असल्याचे या जाहिरातींमध्ये दाखवण्यात आले आहे, असे आदेशात म्हटले आहे. या आदेशात म्हटले आहे की, कंपनी जाहिरातीमध्ये सल्ला देणारे परदेशी दंतवैद्य दाखवू शकत नाही.याशिवाय, CCPA ने Naaptol ऑनलाइन शॉपिंगला '2 सोन्याच्या दागिन्यांचा सेट', 'मॅग्नेटिक नी सपोर्ट' आणि 'अॅक्युप्रेशर योग चप्पल'च्या जाहिरातींवर बंदी घालण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय Naaptolला 10 लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
हेही वाचा - RBI Monetary Policy : आरबीआयकडून 4 टक्के रेपो दर 'जैसे थे', जीडीपी 7.8 टक्के राहण्याचा अंदाज