मुंबई - राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हाडाचे विकास प्रकल्प करण्यासाठी बांधकाम विकसकांना भागीदार म्हणून निमंत्रित केले आहे. ते म्हणाले, राज्य सरकार केवळ सुविधा उपलब्ध करून देणार नाही, तर प्रकल्पामधून मिळविणाऱ्या नफ्यासह जोखीम भागीदारीत घेणार आहे. ते सीआयआयच्या स्थावर मालमत्ता परिषदेत बोलत होते.
जितेंद्र आव्हाड म्हणाले, ज्या दिवशी पदभार घेतला त्या दिवशी मी विकसकांचा समर्थक (प्रो बिल्डर) असल्याचे जाहीर केले. परवडणाऱ्या दरातील घरांसाठी जे काही शक्य असेल ते करणार आहे. त्यामुळे मला वाटते, दृष्टीकोन बदलण्याची गरज आहे. बांधकाम विकसकांनी आमच्यासोबत येवून म्हाडामधील प्रकल्पांचे भागीदार व्हावे.
-
Our Chief Guest - Jitendra Awhad, Hon'ble Minister of Housing Government of Maharashtra led a power packed Inaugural Session at the 2nd CII Real Estate Confluence alongwith our Chairman - Anuj Puri. #ANAROCKxCII #NewAgeNewWays #WatchThisSpace #LiveUpdates #KnowledgePartner pic.twitter.com/lnTwfonXBv
— ANAROCK (@ANAROCK) February 20, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Our Chief Guest - Jitendra Awhad, Hon'ble Minister of Housing Government of Maharashtra led a power packed Inaugural Session at the 2nd CII Real Estate Confluence alongwith our Chairman - Anuj Puri. #ANAROCKxCII #NewAgeNewWays #WatchThisSpace #LiveUpdates #KnowledgePartner pic.twitter.com/lnTwfonXBv
— ANAROCK (@ANAROCK) February 20, 2020Our Chief Guest - Jitendra Awhad, Hon'ble Minister of Housing Government of Maharashtra led a power packed Inaugural Session at the 2nd CII Real Estate Confluence alongwith our Chairman - Anuj Puri. #ANAROCKxCII #NewAgeNewWays #WatchThisSpace #LiveUpdates #KnowledgePartner pic.twitter.com/lnTwfonXBv
— ANAROCK (@ANAROCK) February 20, 2020
हेही वाचा-व्होडाफोन आयडियाने दूरसंचार विभागाला एजीआरचे दिले २,५०० कोटी रुपये
सर्वांना परवडणाऱ्या दरातील घरे देण्याची गरज आहे. त्यासाठी म्हाडाकडून बीडीडी चाळी व रेड लाईट असलेला कामठीपुरा या प्रकल्पांच्या पुनर्विकासाचे आव्हाड यांनी उदाहरण दिले.
हेही वाचा-सोने महागले! जाणून घ्या, कारण...
विशेष आर्थिक क्षेत्रासाठी (सेझ) देण्यात आलेल्या जमीनाचा वापर होत नसल्यास ती परत घेण्यात येणार आहे. त्याचा परवडणाऱ्या दरातील घरांच्या प्रकल्पांसाठी वापर करण्यात येणार असल्याचेही आव्हाड यांनी सांगितले