ETV Bharat / business

कर वाचविताना गुंतवणूक करणार आहात ? 'या' चुका टाळा - विमा

तुम्हाला कर वाचविण्यासाठी गुंतवणूक करायची असेल, तर सर्वप्रथम किती कर भरावा लागणार आहे, हे जाणून घ्या.

प्रतिकात्मक
author img

By

Published : Mar 21, 2019, 8:00 AM IST

मुंबई - आर्थिक वर्ष संपत असल्याने मार्चमध्ये करदात्यांची धावपळ उडते. कर वाचविण्यासाठी करदाते विमा घेतात किंवा गुंतवणूक करतात. कर वाचविताना होणाऱ्या धावपळीतून चुकीचे वित्तीय उत्पादने घेण्याची शक्यता असते.

जर तुम्हाला कर वाचवायचा असेल तर याची काळजी घ्या.

किती कर भरावा लागणार आहे, याची माहिती जाणून घ्या -

तुम्हाला कर वाचविण्यासाठी गुंतवणूक करायची असेल, तर सर्वप्रथम किती कर भरावा लागणार आहे, हे जाणून घ्या. कदाचित तुम्ही भाडे भरणे, भविष्य निर्वाह निधीची रक्कम भरणे, मुलांच्या शिकवणीची फी भरणे, आरोग्यावर खर्च करणे अशा माध्यमातून गुंतवणूक केलेली असण्याची शक्यता आहे. यातूनही कराची बचत होऊ शकते. कर वाचविण्यासाठी गरजेपेक्षा अधिक अथवा कमी गुंतवणूक करू नये. त्यामुळे मिळणारे उत्पन्न पाहा तसेच पगार पत्रक पाहा, त्यानंतर अकाउटंटशी चर्चा करा. त्यानंतर कर वाचविण्यासाठी गुंतवणुकीचा योग्य निर्णय घ्या.

विम्याची लाभ पुरेसा असणे-

८० सी कराच्या सवलतीनुसार करात बचत करण्यासाठी साधारणत: विम्यात गुंतवणूक करण्यात येते. विमा हा कर वाचविण्यासाठी गुंतवणुकीकरता रामबाण मानला जातो. विमाधारकाच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाला लाभ मिळवून देणे हे जीवन विमा पॉलिसीचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. तेव्हा विमा पॉलिसी घेताना कुटुंबाला मृत्यूपश्चात मिळणारा लाभ पुरेसा आहे का, याची खात्री करून घ्या.

उद्दिष्टाशिवाय गुंतवणूक करणे -

विमा पॉलिसीमध्ये गुंतवणूक करून कर वाचविणे हे दु्य्यम उद्दिष्ट असायला हवे. मात्र पुष्कळदा केवळ कर वाचविण्यासाठी विमा पॉलिसी विकत घेतली जाते. त्यानंतर मात्र गुंतागुंत वाढते. गुंतवणुकीपूर्वी उद्दिष्ट निश्चित करा. असे केल्यास तुम्हाला अपेक्षेप्रमाणे फायदा मिळू शकेल.

दीर्घकाळासाठी गुंतवणूक करणे-

विम्याची अंतिम मुदत किती आहे, हे पाहणे महत्त्वाचे असते. विशेषत: जेव्हा तुम्हाला गुंतवणूक ही तुमच्यासाठी योग्य नसताना त्या पॉलिसीमधून बाहेर पडायचे हे ठरविण्यासाठी कालावधी माहित असणे आवश्यक असते.

साधारणत: विम्याचा हप्ता किमान ३ ते ५ वर्षे नियमितपणे भरावा लागतो. तर सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीसाठी १५ वर्षाची मुदत असते. तर राष्ट्रीय बचत प्रमाणपत्राची ५ वर्षांची मुदत असते. जेव्हा तुम्ही गुंतवणूक करणार असाल तेव्हा गुंतवणुकीच्या कालावधीसाठी तयार असणे आवश्यक आहे. जर तुम्हाला भविष्यात चलनाची तरलता लागणार असेल तर तुम्ही कमी कालावधीची गुंतवणूक निवडणे अधिक इष्ट ठरेल.

कर वाचविण्याऱ्या गुंतवणुकीतून किती परतावा मिळतो , याची माहिती नसणे

कर वाचविताना गुंतवणुकीच्या योजनेतून किती परतावा मिळणार आहे, याची माहिती नसणे ही सर्वात मोठी चूक असते. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीतून वार्षिक ८ टक्के विना कर फायदा मिळतो. त्यामुळे प्रत्येक प्रकारच्या गुंतवणुकीतून वार्षिक कमीत कमी ८ टक्के लाभ मिळणे आवश्यक आहे. पारंपरिक पद्धतीने करण्यात येणाऱ्या गुंतवणुकीतून बचत खात्याहून कमी लाभ मिळतो. कर वाचविणाऱ्या गुंतणूक या दीर्घकाळासाठी असतात.त्यामुळे वार्षिक परतावा किती आहे, हे सर्वात आधी जाणून घेणे आवश्यक आहे.

केवळ कर वाचविण्यासाठी गुंतवणूक करणे -

जीवन विमा आणि आरोग्य विमा या दीर्घकाळासाठीच्या वित्तीय योजना असतात. मात्र देशात नियमितपणे विमा भरण्याचे प्रमाण कमी आहे. केवळ ६६ टक्के विमा पॉलिसीचे ५ वर्षानंतर नुतनीकरण केले जाते. वेळेवर विमा पॉलिसीचे नुतनीकरण केले नाहीतर विमाधारकाला मोठा दंड भरावा लागतो. हे टाळण्यासाठी दक्षतेने विमा पॉलिसी दीर्घकाळासाठी टिकविणे आवश्यक आहे.

फॉर्म घाईत भरणे -

डोळे झाकून जीवन विम्याचा फॉर्म भरण्याची साधी वाटणारी चुकही अनेकदा विमाधारक करतात. उदाहरणार्थ - तुम्ही तुमच्या आरोग्याची स्थिती जाहीर केली नाही. त्यामुळे भविष्यात विम्याचा दावा करताना त्रुटी निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे विम्याचा फॉर्म भरताना सर्व माहिती भरा. जिथे शंका असेल, तिथे प्रश्न विचारून सर्व माहिती जाणून घ्या.

कर वाचविणे आणि गुंतवणूक करणे ही दरवर्षी करण्याची आर्थिक प्रक्रिया आहे. त्यामुळे आर्थिक वर्ष संपत असताना विनाकारण तणाव घेऊन चुकीचा निर्णय घेणे टाळणे गरजेचे असते. एप्रिलमध्ये कर सल्लागाराशी चर्चा करा, तुमच्या आर्थिक नियोजनाविषयी स्वत: संशोधन करा. त्यातून करासाठी नियोजन करून कर वाचविण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करा, हे करताना आरोग्य आणि जीवनाला विम्याचे संरक्षण मिळण्यासाठीही खात्री करून घ्या.

(लेखक - अधील शेट्टी हे बँक बझार डॉट कॉमचे सीईओ आहेत. )

Intro:Body:

Beware! you’re about to make these tax saving 

कर वाचविताना गुंतवणूक करणार आहात ?  'या' चुका टाळा  

मुंबई - आर्थिक वर्ष संपत असल्याने मार्चमध्ये करदात्यांची धावपळ उडते. कर वाचविण्यासाठी करदाते विमा घेतात किंवा गुंतवणूक करतात. कर वाचविताना होणाऱ्या धावपळीतून चुकीचे वित्तीय उत्पादने घेण्याची शक्यता असते.  

जर तुम्हाला कर वाचवायचा असेल तर याची काळजी घ्या.

किती कर भरावा लागणार आहे, याची माहिती जाणून घ्या -

तुम्हाला कर वाचविण्यासाठी गुंतवणूक करायची असेल, तर सर्वप्रथम किती कर भरावा लागणार आहे, हे जाणून घ्या. कदाचित तुम्ही भाडे भरणे, भविष्य निर्वाह निधीची रक्कम भरणे, मुलांच्या शिकवणीची फी भरणे, आरोग्यावर खर्च करणे अशा माध्यमातून गुंतवणूक केलेली असण्याची शक्यता आहे. यातूनही कराची बचत होऊ शकते. 

कर वाचविण्यासाठी गरजेपेक्षा अधिक अथवा कमी गुंतवणूक करू नये. त्यामुळे मिळणारे उत्पन्न पाहा तसेच पगार पत्रक पाहा, त्यानंतर अकाउटंटशी चर्चा करा. त्यानंतर कर वाचविण्यासाठी गुंतवणुकीचा योग्य निर्णय घ्या. 

विम्याची लाभ पुरेसा असणे-

८० सी कराच्या सवलतीनुसार करात बचत करण्यासाठी साधारणत: विम्यात गुंतवणूक करण्यात येते. विमा हा कर वाचविण्यासाठी गुंतवणुकीकरता रामबाण मानला जातो. विमाधारकाच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाला लाभ मिळवून देणे हे  जीवन विमा पॉलिसीचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. तेव्हा विमा पॉलिसी घेताना कुटुंबाला मृत्यूपश्चात मिळणारा लाभ पुरेसा आहे का, याची खात्री करून घ्या. 

उद्दिष्टाशिवाय गुंतवणूक करणे - 

विमा पॉलिसीमध्ये गुंतवणूक करून कर वाचविणे हे दु्य्यम उद्दिष्ट असायला हवे. मात्र पुष्कळदा केवळ कर वाचविण्यासाठी विमा पॉलिसी विकत घेतली जाते. त्यानंतर मात्र गुंतागुंत वाढते. गुंतवणुकीपूर्वी उद्दिष्ट निश्चित करा. असे केल्यास तुम्हाला अपेक्षेप्रमाणे फायदा मिळू शकेल. 

दीर्घकाळासाठी गुंतवणूक करणे-

विम्याची अंतिम मुदत किती आहे, हे पाहणे महत्त्वाचे असते. विशेषत: जेव्हा तुम्हाला गुंतवणूक ही तुमच्यासाठी योग्य नसताना त्या पॉलिसीमधून बाहेर पडायचे हे ठरविण्यासाठी कालावधी माहित असणे आवश्यक असते. 

साधारणत: विम्याचा हप्ता किमान ३ ते ५ वर्षे नियमितपणे भरावा लागतो. तर सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीसाठी १५ वर्षाची मुदत असते. तर राष्ट्रीय बचत प्रमाणपत्राची ५ वर्षांची मुदत असते. जेव्हा तुम्ही गुंतवणूक करणार असाल तेव्हा गुंतवणुकीच्या कालावधीसाठी तयार असणे आवश्यक आहे. जर तुम्हाला भविष्यात चलनाची तरलता लागणार असेल तर तुम्ही कमी कालावधीची गुंतवणूक निवडणे अधिक इष्ट ठरेल. 

कर वाचविण्याऱ्या गुंतवणुकीतून किती परतावा मिळतो , याची माहिती नसणे 

कर वाचविताना गुंतवणुकीच्या योजनेतून किती परतावा मिळणार आहे, याची माहिती नसणे ही सर्वात मोठी चूक असते. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीतून वार्षिक ८ टक्के विना कर फायदा मिळतो. त्यामुळे प्रत्येक प्रकारच्या गुंतवणुकीतून वार्षिक कमीत कमी ८ टक्के लाभ मिळणे आवश्यक आहे. पारंपरिक पद्धतीने करण्यात येणाऱ्या गुंतवणुकीतून बचत खात्याहून कमी लाभ मिळतो.  कर वाचविणाऱ्या गुंतणूक या दीर्घकाळासाठी असतात.त्यामुळे वार्षिक परतावा किती आहे, हे सर्वात आधी जाणून घेणे आवश्यक आहे.  

केवळ कर वाचविण्यासाठी गुंतवणूक करणे - 

जीवन विमा आणि आरोग्य विमा या दीर्घकाळासाठीच्या वित्तीय योजना असतात. मात्र देशात नियमितपणे विमा भरण्याचे प्रमाण कमी आहे. केवळ ६६ टक्के विमा पॉलिसीचे ५ वर्षानंतर नुतनीकरण केले जाते. वेळेवर विमा पॉलिसीचे नुतनीकरण केले नाहीतर विमाधारकाला मोठा दंड भरावा लागतो. हे टाळण्यासाठी दक्षतेने विमा पॉलिसी दीर्घकाळासाठी टिकविणे आवश्यक आहे. 

फॉर्म घाईत भरणे -

डोळे झाकून जीवन विम्याचा फॉर्म भरण्याची साधी वाटणारी चुकही अनेकदा विमाधारक करतात. उदाहरणार्थ - तुम्ही तुमच्या आरोग्याची स्थिती जाहीर केली नाही. त्यामुळे भविष्यात विम्याचा दावा करताना त्रुटी निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे विम्याचा फॉर्म भरताना सर्व माहिती भरा. जिथे शंका असेल, तिथे प्रश्न विचारून सर्व माहिती जाणून घ्या. 

कर वाचविणे आणि गुंतवणूक करणे ही दरवर्षी करण्याची आर्थिक प्रक्रिया आहे. त्यामुळे आर्थिक वर्ष संपत असताना विनाकारण तणाव घेऊन चुकीचा निर्णय घेणे टाळणे गरजेचे असते. एप्रिलमध्ये कर सल्लागाराशी चर्चा करा, तुमच्या आर्थिक नियोजनाविषयी स्वत: संशोधन करा. त्यातून करासाठी नियोजन करून कर वाचविण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करा, हे करताना आरोग्य आणि जीवनाला विम्याचे संरक्षण मिळण्यासाठीही खात्री करून घ्या. 

(लेखक - अधील शेट्टी हे बँक बझार डॉट कॉमचे सीईओ आहेत. )

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.