कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीमुळे आदरातिथ्य क्षेत्राला (हॉस्पिटिलीटी सेक्टर) मोठा चालना मिळाली आहे. कोरोनाच्या काळाने फटका बसलेल्या आदरातिथ्य क्षेत्राला काहीसा दिलासा मिळत आहे.
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका पार पडत आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय नेते आणि माध्यम प्रतिनिधींचे बंगालमध्ये हॉटेल बुकिंगचे प्रमाण वाढले आहे. कोलकाता आणि जिल्ह्यांमध्ये हॉटेल बुकिंगची मागणी वाढली आहे. त्यामुळे उद्योगाचे पुनरुज्जीवन होण्यासाठी चालना मिळत असल्याचे हॉटेल अँड रेस्टॉरंट्स असोसिएशन ऑफ इस्टर्न इंडिया सेक्रेटरी सुदेश पोद्दार यांनी सांगितले.
हेही वाचा-स्पॉटिफायचे मोबाईल अॅपवरील फिचर डेस्कटॉपवरही अनुभवता येणार!
पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीत भाजपकडून तृणमुल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांना मोठे आव्हान देण्याचा प्रयत्न आहे. ममता बॅनर्जी या तिसऱयांदा मुख्यमंत्रिपद मिळविण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भाजपकडून आघाडीच्या नेत्यांसह मध्यमपातळीच्या नेत्यांसाठी कोलकात्यामधील टॉपच्या हॉटेलमध्ये रुम बुकिंग केल्या जात आहेत. तसेच राष्ट्रीय पातळीवरील माध्यमांकडून प्रतिनिधींसाठी हॉटेल बुकिंग केल्या जात आहेत.
हेही वाचा-कोव्हॅक्सच्या चाचणीची भारतात सुरुवात; सप्टेंबरमध्ये लाँच होण्याची शक्यता
- कोरोना महामारीमुळे देशातील आदरातिथ्य क्षेत्रावर आणि पर्यटन क्षेत्रावर मोठा परिणाम झाला आहे.
- तिन्ही तिमाहीत एकूण 15 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
- पश्चिम बंगालमध्ये 1 हजार ते 1,200 पंचतारांकित हॉटेल आहेत.
- पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी 27 मार्चला मतदान पार पडले.
- पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या पहिल्या टप्प्यासाठी 79.79 टक्के मतदान झाले आहे.