नवी दिल्ली - प्राप्तिकर विभागाने बेनामी संपत्ती असलेल्या हरियाणामधील काँग्रेस नेत्याच्या हॉटेलवर जप्ती आणली आहे. हे हॉटेल काँग्रेसचे नेते कुलदीप बिष्णोई यांच्या मालकीचे आहे.
प्राप्तिकर विभागाच्या माहितीनुसार ब्रिस्टॉल हॉटेलवर जप्ती आणण्यात आली आहे. हे हॉटेल ब्राईट स्टार हॉटेल प्रायव्हेट लि. कंपनीच्या मालकीचे आहे. ही कंपनी काँग्रेस नेते कुलदीप बिष्णोई व त्यांच्या भावाशी संबंधित आहे. त्यांचे ब्रिटिश व्हर्जिन इसलँडमध्ये नोंदणी केलेल्या ब्राईट स्टारमध्ये ३४ टक्के शेअर आहेत. ही कंपनी संयुक्त अरब अमिरातीमधून चालविण्यात येत होती. हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भजनलाल यांचे चिरंजीव बिष्णोई व चंदर मोहन यांच्या मालकीची मालमत्ता आणि कंपनी असल्याचा दावा करण्यात येत आहे.