नवी दिल्ली - सरकारी बँक असलेल्या बँक ऑफ बडोदाची पुढील आठवड्यात बैठक होणार आहे. या बैठकीत रोख्यामधून भांडवल उभा करण्यावर चर्चा करण्यात येणार आहे.
बँकेच्या भांडवल निर्मिती समितीचे (सीआरसी) पूर्णवेळ संचालक हे १८ सप्टेंबरला बैठकीत सहभागी होणार आहेत. बीएस -३ चे श्रेणी - २ चे रोखे व श्रेणी -१ चे रोखे काढण्यावर समिती विचार करणार आहे.
हेही वाचा-इम्रान खान यांचा 'नया पाकिस्तान,' गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी बेली डान्सरचा वापर, पाहा VIDEO
किती प्रमाणात रोखे काढण्यात येणार आहे, याबाबत बँकेने माहिती दिली नाही. बँक ऑफ बडोदाचे शेअर ४ टक्क्यांनी घसरून प्रति शेअर हे ९७.२० रुपये झाले आहेत.
हेही वाचा-धक्कादायक! 32,000 कोटींच्या विविध प्रकरणात 18 सरकारी बँकांची फसवणूक